घरदेश-विदेशलंडनमधील दुसरा रुग्ण ठरला HIV मुक्त, डॉक्टरांनी केला दावा

लंडनमधील दुसरा रुग्ण ठरला HIV मुक्त, डॉक्टरांनी केला दावा

Subscribe

जीवनातील दुर्धर आजार म्हणून ओळखला जाणारा एचआयव्हीवर उपचार शोधण्याचा दावा करण्यात आला आहे. या औषधामुळे लंडन मधील दुसऱ्या व्यक्तीला वाचवण्यास यश आले आहे.

HIV सारख्या जीवघेण्या आजारामुळे दरवर्षी लाखो रुग्णांना आपले प्राण गमावावे लागतात. HIV च्या अज्ञानामुळे लोकांचा मृत्यू होऊ नये म्हणून सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. HIV संदर्भात जनजागृती करण्यात आल्यानंतर देखील रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. HIV वर अजूनही कोणता उपचार निघाला नसल्याचे सांगण्यात येते त्यामुळे लागण होण्यापूर्वीच त्यापासून वाचणे गरजेचे आहे. मात्र उपचार नसलेल्या HIV पासून आता रुग्णांना वाचवले जाऊ शकत असल्याचा दावा लंडन येथील डॉक्टरांनी केला आहे. लंडनमधील एका रुग्णाला HIV पासून वाचवण्यात यश आले आहे. HIV पासून वाचणारा हा जगातील दुसरा व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे. मागील १८ महिन्यांपासून या रुग्णाने HIV नियंत्रणामध्ये आणण्यासाठी कोणतेही औषध घेतले नाही. त्यामुळे हा रुग्ण आता आजारापासून बरा झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

“आम्ही या रुग्णाच्या आजारावर मागील अनेक महिन्यांपासून उपचार करत आहोत. त्याला दिलेल्या औषधांमुळे त्याच्या शरीरातील HIV चे विषाणू कमी झाले आहे. या रुग्णाच्या शरीराची चाचणी डॉक्टरांकडून करण्यात आली. यानंतर त्याच्या शरीरात HIV चे विषाणू आढळून आले नाहीत. त्यामुळे आता हा रुग्ण HIV पासून बचावला आहे.” – रुग्णालयातील डॉक्टर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -