घरदेश-विदेशमसूदच्या अटकेवर पाकिस्तान २४ तासात निर्णय घेणार

मसूदच्या अटकेवर पाकिस्तान २४ तासात निर्णय घेणार

Subscribe

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला अटक करायची की नाही याचा निर्णय पुढील २४ तासाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान घेणार असल्याची माहिती पाकिस्तानच्या मंत्रालयाने दिली आहे.

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला अटक करायची की नाही याचा निर्णय पुढील २४ तासाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान घेणार असल्याची माहिती पाकिस्तानच्या मंत्रालयाने काल, मंगळवारी दिली आहे. मसूद अझहरसंबंधीचा डोझियर यापूर्वीच भारताने पाकिस्तानला सोपवला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर भारतासह इतर देशांकडूनही मसूद अझहरला अटक करण्यासाठीचा दबाव वाढला आहे. दरम्यान, काल पाकिस्तानने मसूद अझहरचा भाऊ आणि मुलासह ४४ दहशतवाद्यांना अटक केली आहे. तर त्याच्या मुलाला प्रतिबंधक कस्टडीत ठेवण्यात आले आहे.

जैशच्या ४४ दहशतवाद्यांना अटक 

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ४४ दहशतवाद्यांवर पाकिस्तानने अटकेची कारवाई केली. भारताच्या दबावानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरच्या अनेक नातेवाईकांचा समावेश आहे. मसूदचे भाई अब्दुर रौफ आणि हम्माद अझरसह ४४ जणांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

मसूदच्या संबंधीच्या अफवांना उधाण 

पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. काहींनी मसूद अजहर याचा मृत्यू लिव्हरच्या कर्करोगमुळे झाल्याचा दावा केला होता. तर, काहींनी भारताने जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेल्या हल्ल्यात अझहरचा मृत्यू झाल्याचं प्रसारमाध्यमांचं म्हणणं होतं. मात्र, एएनआय वृत्तसंस्थेने पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने मसूद अझहर जिवंत असल्याचं सांगितलं. मसूद अझहर जिवंत असून त्याच्यावर हॉस्पिटल उपचार सुरु असल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला होता. रविवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने मसूदला रावळपिंडी येथील रुग्णालयातून बहावलपूरमधील गोथ गन्नी येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हलवले आहे, असं टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या बातमीत म्हटलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -