घरदेश-विदेशपैगंबरांच्या कार्टुनचा वाद चिघळला; फ्रान्समध्ये अल्ला हू अकबरचे नारे देत तिघांची हत्या

पैगंबरांच्या कार्टुनचा वाद चिघळला; फ्रान्समध्ये अल्ला हू अकबरचे नारे देत तिघांची हत्या

Subscribe

फ्रांसमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. नीस शहरात हल्लेखोरांनी भररस्त्यात एका महिलेचा शिरच्छेद केला असून चर्चबाहेर उभ्या असलेल्या दोघांची चाकू भोसकून हत्या केली आहे. या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. नीसचे महापौर यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले आहे.

- Advertisement -

नीसचे महापौर क्रिस्टियन एस्ट्रोसी यांनी ट्विटवरव या हल्ल्याची माहिती दिली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीचा हवाला देत क्रिस्टियन यांनी सांगितले की, हल्लेखोर हा ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही तो घोषणा देण्याचा थांबला नाही. पोलिसांनी हल्लेखोरावर गोळी झाडली असून तो अद्याप जिवंत आहे. उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

क्रिस्टियन यांनी पुढे सांगितले की, “आता बस झाले. फ्रान्सने शांतता राखण्यासाठी इस्लामधार्जिण्या दहशतवादाला आपल्या देशातून उखडून फेकले पाहीजे.”

- Advertisement -

फ्रान्समध्ये हल्ला झाल्यानंतर सौदी अरब देशातील फ्रान्सच्या वाणिज्य दुतावासाबाहेरही हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. दुतावासाच्या गार्डला चाकू खुपसण्यात आला. रियाध येथील दुतावासाने हल्ल्यानंतर माहिती देताना सांगितले की, गार्डच्या जीविताला धोका नाही, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. परदेशात असलेल्या दुतावासावर अशाप्रकारे हल्ला करणे निषेधार्ह असल्याचे दुतावासातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शार्ली हेब्दोमध्ये छापून आलेल्या कार्टुनचा वाद

फ्रान्समध्ये पाच वर्षांपूर्वी शार्ली हेब्दो या व्यंगनियतकालिकामध्ये इस्लाम धर्मियांचे पवित्र प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर एक व्यंगचित्र रेखाटण्यात आले होते. त्यानंतर शार्ली हेब्दोच्या कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी तेथील दहा पत्रकार, व्यंगचित्रकारांची हत्या केली होती. इस्लामविरोधात कुणीही टीका केली तर त्यांची हीच अवस्था केली जाईल, असा संदेश त्यातून देण्यात आला होता.

१७ ऑक्टोबर रोजी पुन्हा या विषयाने डोके वर काढले. पॅरीस येते एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना शार्ली हेब्दोमध्ये छापलेले ते व्यंगचित्र दाखविले. त्यामुळे भडकलेल्या दहशतवाद्यांनी संबंधित शिक्षकाचा गळा चिरून त्यांची हत्या केली. यानंतर शार्ली हेब्दोचा विषय पुन्हा ऐरणीवर आला होता. त्यातूनच आज पुन्हा नीसवर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -