घरदेश-विदेशToday petrol diesel price: सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल किंमतींचा भडका, जाणून घ्या...

Today petrol diesel price: सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल किंमतींचा भडका, जाणून घ्या आजचे दर

Subscribe

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा किमतींमध्ये वाढ झाल्याने पेट्रोलिय कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा सपाटा सुरु केला आहे. गेल्या सलग तीन दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचा दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे आज पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल ३० पैशांनी महागले आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता पून्हा इंधन दरवाढीमुळे महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

दरम्यान देशभरातील अनेक राज्यांमध्ये इंधन दरवाढीने पून्हा नवे रेकॉर्ड रचण्यास सुरुवात केली आहे. यात मुंबई पेट्रोलचा प्रतिलीटर दर ९७. ३४ चेन्नईत ९२.९०, कोलकत्तामध्ये ९१.१४ , तर बंगळुरूमध्ये ९४.०१ रुपये इतका झाले आहे. तर डिझेलचा दर प्रति लीटर मुंबई, चेन्नई, कोलकत्ता आणि बंगळुरमध्ये अनुक्रमे ८८.४९, ८६.३५, ८४.२६, ८६.३१ इतके असल्याचं निदर्शनास आलं.

- Advertisement -

दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलांचा किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. यात मंगळवारी सात आठवड्यानंतर कच्चा तेलाचा किमतीने नवा उच्चांक गाठला. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून देशात इंधन दरवाढ सुरुच असून पेट्रोल ६२ पैसे तर डिझेल ६९ पैशांनी महाग झाले आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?

मुंबई: पेट्रोल- ९७.३४, डिझेल ८८.४९

- Advertisement -

पुणे: पेट्रोल- ९६.७०, डिझेल ८६.८२

रायगड: पेट्रोल- ९७.०१, डिझेल ८८.४९

औरंगाबाद : पेट्रोल- ९७.७९, डिझेल- ८७.७५

चंद्रपूर: पेट्रोल- ९७.३४, डिझेल ८७.१८

‘या’ ठिकाणी पाहू शकता पेट्रोल-डिझेलचे दर

इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर दररोज पाहता येऊ शकतात. दरम्यान एसएमएसद्वारेही तुम्हाला पेट्रोल- डिझेलच्या किंमतींची माहिती मिळवू शकते यासाठी तुम्हाला RSP आणि तुमच्या शहराचा पिन कोड टाईप करुन 9224992249 या क्रमांकावर एस मेसेज पाठवावा लागतो.


Coronavirus : कोरोनामुक्त रुग्णांना ‘म्यूकोर्मिकोसिस फंगल इन्फेक्शन’चा धोका


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -