घरदेश-विदेशतृतीयपंथी महिला उमेदवार गायब

तृतीयपंथी महिला उमेदवार गायब

Subscribe

तेलंगणामधील गोशमहाल मतदार संघातून राज्यात पहिल्यांदाच उभी राहिलेली तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता झाली आहे. ही तृतीयपंथी बहुजन डावी आघाडी या पक्षाकडून उभी होती.

तेलंगणा येथे पहिल्यांदाच निवडणुक लढवणारी तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. चंद्रमुखी मुव्वाला असे या तृतीयपंथीचे नाव आहे. पुढील महिन्यात तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या ११९ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत ही तृतीयपंथी बहुजन डावी आघाडी पक्षाकडून उभी होती. मागील काही दिवसांपासून चंद्रमुखी निवडणुकीचा प्रचार कामात होती. या प्रकरणी बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी चंद्रमुखीचा शोध सुरु केला आहे. चंद्रमुखी तिच्या राहत्या घरातून हरवली असल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तेलंगणा हिजरा समितीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार चंद्रमुखीच्या मैत्रिणीने हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. चंद्रमुखीला पूर्ण दिवस शोधल्यानंतर ही तक्रार नोंदवण्यात आली. चंद्रमुखीपर्यंत पोहचू शकत नसल्याने तिचे अपहरण केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सीसीटीवीच्या आधारावर तपासाला सुरुवात

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रमुखीने सोमावरी आपली प्रचारसभा पूर्ण केली. सभा पूर्ण करुन रात्री उशीरा ती घरी आली होती. पहाटे काही माणसे तिला भेटण्यासाठी आली होती. यानंतर चंद्रमुखी त्यांच्या सोबत गेली. यानंतर चंद्रमुखी बेपत्ता झाली. पोलीस सीसीटीवीच्या आधारावर तिचा शोध सुरु केला आहे.

- Advertisement -

चंद्रमुखी ही राज्यातील पहिली तृतीतयपंथी आहे. मागील अनेक वर्षांपासून चंद्रमुखी सामाजिक कार्य करते. तृतीयपंथीयांच्या मुद्यावर चंद्रमुखीने अनेक आंदोलने केलीत. चंद्रमुखी निवडणूक जिंकण्याचा फायदा तृतीयपंथी समाजाला होणार असल्याने तिचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप समितीने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -