घरटेक-वेकभारतात आला Realmeचा नवा स्मार्टफोन U1

भारतात आला Realmeचा नवा स्मार्टफोन U1

Subscribe

Realme फोनसोबत यावेळी दोन अॅसेसरीज देखील लॉन्च करण्यात आल्या आहेत. यात U1 आयकॉनिक केल आणि Realme बड्सचा समावेश आहे.

Realme या कंपनीने आज त्यांचा नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. U1 हा नवा कोरा स्मार्टफोन आता मोबाईलप्रेमींना मिळणार आहे. Realme 2 pro आणि Realme C1 या फोननंतर अवघ्या आठवड्याभरातच Realmeने हा नवा कोरा फोन भारतात लॉन्च केला आहे. या फोनची किंमत १२ हजार ते १५ हजार इतके असून हा फोन तुम्हाला अमेझॉनवर डिसेंबर पासून मिळणार आहे.

कसा आहे Redmi Note 6 Pro? वाचा रिव्ह्यु!

काय आहेत फोनची वैशिष्ट्ये

Realme हा फोन ३ जीबी आणि ४ जीबी या दोन व्हेरिएंटमध्ये मिळणार आहे. ३ जीबी फोनची इंटरनल मेमरी ३२ जीबी आहे तर ४जीबीमध्ये ६४ जीबी इंटरनल मेमरी आहे.त्यामुळे पहिला बेसिक फोन हा ११हजार ९९९ रुपयांचा आहे आणि दुसरा फोन १५ हजार ९९९ रुपयांना आहे. फोनची स्क्रिन ६.३ इंच असून IPS LCD डिस्प्ले आहे. 13MP + 2MP कॅमेरा या फोनमध्ये आहे. फोनमध्ये 3,500mAhची बॅटरी आहे. पण हा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार नाही. फोनमध्ये अँड्राईड 8.1 ओरिओ OS सिस्टीम आहे.

- Advertisement -
REALME U1
Realme चा नवा U1

अॅसेसरीज लॉन्च

Realme फोनसोबत यावेळी दोन अॅसेसरीज देखील लॉन्च करण्यात आल्या आहेत. यात U1 आयकॉनिक केल आणि Realme बड्सचा समावेश आहे. या दोघांची किंमत ४९९ प्रत्येकी असून लॉन्चिंगच्या काळात यावर ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे.

मोबाईलच्या चार्जिंगची चिंता मिटली

अमेझॉनवर सेल

Realme U1  ऑनलाईन मिळणार असून ५ डिसेंबर रोजी फक्त अॅमेझॉनवर असणार आहे. या फोनच्या खरेदीवर आकर्षक ऑफर्सदेखील देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -