घरताज्या घडामोडीपीएम मोदींच्या मोरबी यात्रेत 30 कोटींचा खर्च, बनावट दस्तावेज बनवल्याचं पोलिसांकडून उघड

पीएम मोदींच्या मोरबी यात्रेत 30 कोटींचा खर्च, बनावट दस्तावेज बनवल्याचं पोलिसांकडून उघड

Subscribe

अहमदाबाद: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोरबी यात्रेत 30 कोटींचा खर्च झाल्याचे दस्तावेज तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ता साकेत गोखले यांनी तयार केले आहेत. परंतु हे दस्तावेज बनावट असल्याचं गुजरात पोलिसांकडून उघड करण्यात आलं आहे.

- Advertisement -

गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेस प्रवक्ता साकेत गोखले यांनी पीएम मोदींच्या मोरबी यात्रामध्ये 30 कोटी रुपये खर्च झाल्याचे दस्तावेज बनावट आहेत. सायबर पोलिसांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण आरटीआयचे दस्तावेज स्वतः साकेत गोखले यांनी तयार केले होते. या सर्व कारणास्तव पोलीस तक्रारकर्त्याने त्वरित बदल केले.

गुजरात पोलिसांनी सांगितले की, साकेत गोखले यांनी दस्तावेज बनवत आरोप केले होते. परंतु पुलाची दुर्घटना घडल्यानंतर पीएम नरेंद्र मोदींनी मोरबी यात्रेत 30 कोटी रुपये खर्च केले. यावर साकेत गोखले यांनी ट्विट केल्यानंतर जयपूरमधून त्यांना अटक करण्यात आली. ज्यामध्ये सांगण्यात आलंय की, आयटीआयकडून माहिती मिळाली आहे की, पीएम मोदींच्या मोरबी यात्रेत 30 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

- Advertisement -

भाजपा नेता अमित कोठारी यांनी अहमदाबाद पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यांना गोखले यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. गोखले यांनी आपल्या ट्वीटमध्ये मिडिया क्लिपिंगमध्ये गुजरात वर्तमानपत्राच्या फॉन्टचा वापर करत दावा केला होता की, हा आरटीआयचा जबाब आहे.


हेही वाचा : पंतप्रधान मोदींचा तेजस्वी यादवांना फोन, लालू प्रसादांच्या प्रकृतीची केली विचारपूस


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -