घरक्राइमतुनिषा शर्मा आत्महत्येचं श्रद्धा वालकर कनेक्शन, लव्ह जिहादच्या भीतीने शिझानसोबत ब्रेकअप?

तुनिषा शर्मा आत्महत्येचं श्रद्धा वालकर कनेक्शन, लव्ह जिहादच्या भीतीने शिझानसोबत ब्रेकअप?

Subscribe

गेल्या महिन्यात वसईतील श्रद्धा वालकर हत्याकांडाने अवघ्या देशाला हादरवलं होतं. या घटनेचा गंभीर परिणाम टीव्ही जगतातील एका जोडप्यावरही होईल याची कोणी कल्पनाही करु शकतं नव्हतं. दोन दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली. अली बाबा दास्तान-ए-कबुल’ या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या तुनिषा शर्माने वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी मृत्यूला कवटाळलं. तिच्या मृत्यूनंतर आता लव्ह जिहादचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कारण तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान खाननेही ब्रेकअपचं कारण लव्ह जिहादची भीती असं सांगितल्याचे सूत्रांचे मत आहे. परंतु पोलिसांनी असा कोणताही प्रकार नसून हे सर्व आरोप नाकारले आहेत. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणी अभिनेता शिझान खान याला अटक करण्यात आली आहे.

श्रद्धा वालकर आणि आफताबच्या केसनंतरच तुनिषाने ब्रेकअप केल्याचं शिझान खानने म्हटले आहे. तुनिषा आणि शिझानचे 15 दिवसांपूर्वी ब्रेकअप झाले तेव्हापासून ती खूप तणावाखाली होती. तुनिषाला नेहमी वाटायचे की, आपली देखील श्रद्धा वालकरप्रमाणे हत्या होऊ शकते अशी शक्यता त्यात पोलिसांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

तुनिषा धर्माने हिंदू होती तर शिझान धर्माने मुस्लिम आहे. यात तुनिषाचे वय 20 आणि शिझानचे वय 28 आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या धर्म आणि वयातील अंतरामुळे शिझानने ब्रेकअप केल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण पोलिसांचा त्यावर विश्वास नाही. अशाच तुनिषाचे आईनेही शिझानवर गंभीर आरोप केले आहेत.

तुनिषाच्या आईच्या मते, ब्रेकअपनंतर तुनिषाची प्रकृती खालावली होती. 16 डिसेंबरला जेव्हा दोघांचं ब्रेकअप झालं तेव्हापासून तुनिषाची आई वनिता स्वत: एक दिवस आड तिच्यासोबत सेटवर जात होती, पण आत्महत्येच्या दिवशी तुनिषाची आई तिच्यासोबत नव्हती गेली. पण त्यावेळी ड्रायव्हरकडून तिची आई खुशाली जाणून घेत होती. दरम्यान त्या दिवशी ड्रायव्हरने तुनिषा आणि शिझान एकत्र जेवत असल्याची माहिती तुनिषाच्या आईला दिली. त्यामुळे ब्रेकअपमधून सावरत असताना तुनिषाने आत्महत्येचा निर्णय का घेतला? असा प्रश्न तिच्या आईने उपस्थित केला आहे.

- Advertisement -

मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे आधीही तुनिषाने शिझानच्या ब्रेक-अपनंतर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शिझान खाननेच तुनिषाचा जीव वाचवल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. इतकचं नाहीतर तिची काळजी घेण्याचा सल्लाही शिझानने कुटुंबियांना दिला होता.

दरम्यान शिझानने आत्महत्या झाली त्यादिवशीचा घटनाक्रम पोलिसांना सांगितला आहे. आत्महत्येच्या एक दिवस आधी तुनिषाने अन्नाचा एकही कण खाल्ला नाही, आत्महत्येच्या दिवशी सेटवर तुनिषाने काही खाल्ले नव्हते. शिझानने तुनिषाला खाण्याचा आग्रह धरला, पण तिने नकार दिला, यावेळी शिझान शूटिंगसाठी मेकअप रुममधून बाहेर पडला. पण बराचवेळ झाला तुनिषा मेकअप रुममधून बाहेर न आल्याने शिझान पुन्हा तिथे आला. यावेळी त्याने मेकअप रुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आतून लॉक होता. यावेळी त्याने तुनिषाला हाक मारली मात्र त्याने तिच्या हाकेलाही प्रतिसाद दिला नाही. यावेळी शिझानने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मेकअप रुमचा दरवाजा तोडला. तेव्हा तुनिषा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली, यावेळी शिझानने तुनिषाला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.


…तर हिंदू त्यांच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्रं बाळगू शकत नाहीत का? साध्वी प्रज्ञांचे वादग्रस्त विधान

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -