घरताज्या घडामोडीVIDEO: शक्तिशाली भूकंपाने तुर्की हादरलं; पत्त्यांसारख्या कोसळल्या इमारती

VIDEO: शक्तिशाली भूकंपाने तुर्की हादरलं; पत्त्यांसारख्या कोसळल्या इमारती

Subscribe

तुर्की आणि ग्रीस देश आज (शुक्रवार) भूकंपाचे तीव्र झटक्यांनी हादरले. या भूकंपाची तीव्रता ७ रिश्टर स्केल असल्याचे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेने सांगितलं आहे. भूकंपाने इझमिर (Izmir) हे शहर हादरलं आहे. या विनाशकारी भूंकपामुळे इजमिर शहरातील इमारतींचे मोठे नुकसान झाले. शहरात सुनामीसारखी परिस्थिती निर्माण झाली. शहरांमधल्या रस्त्यांवर पाणी घुसलं असून त्याचा वेगही प्रचंड आहे. या प्रचंड वेगात घरं, गाड्या आणि इतर सामान वाहून गेलं. हा वेग एवढा प्रचंड होता की बचाव कार्यही करता आलं नाही. सोशल मीडियावरही याचे अनेक VIDEO व्हायरल झाले असून ते पाहिले तरी थरकाप उडाल्याशीवाय राहणार नाही. ताज्या माहितीनुसार, आत्तापर्यंत या भूंकपात चार जणांचा मृत्यू झाला असून १२० लोक जखमी झाले आहेत.

- Advertisement -

युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या (ईएमएससी) माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल इतकी होती. याचं केंद्र समोसच्या ग्रीक बेटांपासून १३ किमी ईशान्येला होता. तर तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थान विभागाच्या अध्यक्षांनी सांगितलं की, भूकंपाची तीव्रता ६.६ नोंदवली गेली आहे. याचं केंद्र १६.५ किमी खोलवर होतं.

- Advertisement -

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -