VIDEO: निर्दयीपणाचा कळस! मतिमंद तरुणाला दोरीनं बांधत नेलं खेचत

dragging the mentally retarded youth tied with a rope

मतिमंद मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात अवघ्या १३ दिवसांच्या मतिमंद बाळाला जन्मदात्यानींच पुरून टाकल्याची घटना घडली. दरम्यान, आता उत्र प्रदेशमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. एका मतिमंद मुलाला दोरीने बांधून खेचलं जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून संताप व्यक्त केला जात आहे.

उत्तर प्रदेशमधील बहराइच जिल्ह्यातील घटना आहे. हा मतिमंद तरुण एका घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्या तरुणाच्या काकाने त्याला दोरीने बांधत अक्षरश: एखादी वस्तू खेचावी तसं या मतिमंद मुलाला खेचलं.

 

जनपद बहराइच…..

**इंसानियत हुई तार तार मन बुद्धि युवक को रस्सी से बांधकर घसीटा**

**भतीजे के साथ चाचा की अमानवीयता का वीडियो हुआ वायरल रस्सी से मंदबुद्धि युवक को बांधकर घसीटा और पिटा**

**ये वायरल वीडियो 3 पहले का है और हुजूरपुर थाना के अंतर्गत बांसगाव का बताया जा रहा है**

Posted by Sidhanshu Abp Bahrat on Thursday, 29 October 2020

मतिमंद तरुण हा अर्धनग्न आहे. अशा अवस्थेत त्याच्या काकाने त्याला दोरीनं बांधलं आणि घरापासून काही अंतरापर्यंत दगड-माती असलेल्या या जमिनीवरून खेचत नेलं. तरुण वेदनेने किंचाळत आहे. पण त्याच्या काकाच्या मनाला थोडाही पाझर फुटला नाही, त्याला त्याची दया आली नाही. मन हेलावणारा हा आहे.