घरदेश-विदेशट्विटरचा 43 हजार भारतीय युजर्सना दणका! नियमांचे उल्लंघन केल्याने अकाऊंट केले बंद

ट्विटरचा 43 हजार भारतीय युजर्सना दणका! नियमांचे उल्लंघन केल्याने अकाऊंट केले बंद

Subscribe

जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर सध्या अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. अशात एका वेगळ्या कारणामुळे ट्विटरची भारतात जोरदार चर्चा सुरु आहे. ट्विटने 43 हजार भारतीय युजर्सना दणका दिला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्विटरने 43 हजार भारतीयांचे ट्विटर अकाऊंट बंद केले आहे. यातील काही अकाऊंटमध्ये हिंसाचार, वर्णद्वेष आणि दहशतवादाला खतपणी घालणाऱ्या पोस्ट करण्यात आल्या होत्या. दरम्यान या अकाऊंटची ओळख केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे ट्विटरकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच ट्विटरवर या प्रकराच्या पोस्टविरोधात अनेक युजर्सनी ट्विटरकडे तक्रार केली होती. याशिवाय ट्विटरवरून अशाप्रकारचे अकाऊंट बंद करण्यासाठी देशातील आयटी नियमांचा देखील आधार घेण्यात आला होता. याप्रकरणी ट्विटरने एक रिपोर्ट जारी केला आहे. ज्यात त्यांनी म्हटले की, ट्विटर व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करतो, कोणताही व्यक्ती त्याचं मत ट्विटरवर मांडू शकतो. परंतु ट्विरवर कोणत्याही द्वेषपूर्ण, भेदभाव करणाऱ्या. कोणाच्याही व्यक्तीस स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पोस्टला किंवा युजर्सला ट्विटरवर थारा नाही. त्यामुळे आम्ही भारतातील 43 हजार अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून ट्विटवरील ट्रेंड्स, नियमांचे उल्लंघन आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर कारवाई करण्यावरून ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष निर्माण झाला. यानंतर केंद्राने काही दिवसांपूर्वी ट्विटरला त्यांच्या वेबसाईटवरून काही कंटेंट हटवण्याचे आदेश दिले. मात्र यानंतर ट्विटरने याविरोधात कर्नाटक हायकोर्टात धाव घेतली आहे.


राजकारण्यांच्या हातामध्ये देश देऊन काहीही होणार नाही…सुबोध भावेचा खोचक टोला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -