घरदेश-विदेशजम्मू-काश्मीर हल्ल्यात एक जवान शहीद; सहा दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर हल्ल्यात एक जवान शहीद; सहा दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात झालेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाले असून सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तांकडून वारंवार हल्ले सुरुच आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात गुरुवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक लष्कर जवान शहीद झाले असून एक जवान गंभीर जखमी झाले आहेत. तर या हल्ल्यात सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

बारामुल्ला परिसरात गुरुवारी दुपारी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा रात्री उशिरा दहशतवाद्यांनी ४२ राष्ट्रीय रायफल्सच्या त्रालमधील कॅम्पवर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाले असून एक जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात जवानांनीही दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पसार झाले आहे. जवान दहशतवाद्यांचा शोध घेत असून त्यांनी संपूर्ण परिसराला वेढले आहे.

- Advertisement -

वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; ३ दहशतवादी ठार, ४ एके ४७ जप्त

वाचा – जम्मू – काश्मीरमध्ये ३ जवान शहीद

- Advertisement -

वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -