घरदेश-विदेशफार वाईट! जन्मदात्या आईलाच कृतघ्न मुलांनी रस्त्यावर टाकलं

फार वाईट! जन्मदात्या आईलाच कृतघ्न मुलांनी रस्त्यावर टाकलं

Subscribe

मथुरामध्ये जन्मदात्या आईलाच कृतघ्न मुलांनी रस्त्यावर टाकले आहे.

आईचं आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. आपण आईला मायेचा सागर म्हणतो. ‘थोर तुझे उपकार’ म्हणत तिचा गोडवा गातो. परंतु, याच आईला रत्यावर टाकून जाणारे निर्दयी आणि कृतघ्न मुलंदेखील या समाजात अस्तित्वात आहेत. मथुरामध्ये दोन मुलांनी आपल्या ८० वर्षाच्या आईला रसत्यावर टाकूण दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या महिलेला सध्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. परंतु, या घटनेमुळे माणुसकी खरच संपत चालली आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जगातील कुठल्याच मुलांनी आपल्या आई-वडिलांसोबत असे वागू नये.

आईला बेदम मारहाण

आईला रस्त्यावर सोडून जाणारे हे मुलं मथुरेचे आहेत. या वृद्ध महिलेचे नाव सेना देवी असे आहे. वृद्धेला दोन दिवसांपूर्वी तिच्या मुलांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर ते दोघेही तिला घेऊन वृंदावन येथे आले आणि तिथेच सोडून निघून गेले. आपली मुलं कामासाठी गेले असतील असं समजून ही महिला रस्त्यावरचस पडून राहीली. दोन दिवसा होऊन गेले, पण मुलांचा पत्ता नाही. कडाक्याची थंडीमुळे ती आजारी पडली. परिसरातील आजूबाजूच्या लोकांना तिची दया आली. त्यांनी वृद्ध महिलेला चादरी आणि गोधळी दिली. तिला जेवनही लोकांनी दिले. लोकांनी तिला पत्ता विचारला असता, आपण वृंदावन येथे राहतो, अशी माहिती महिलेनी दिली. तिने तेथील नागरिकांना बसमध्ये बसवून देण्याची विनंती केली. एकाने तिला नोएडा जाणाऱ्या बसमध्ये बसवून दिलं. पण ती अर्ध्या वाटेवर बसमधून उतरली. तेव्हा एका तरुणाने पोलिसांना कळवले. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -