घरदेश-विदेशकृष्णवर्णीय म्हणजे कुरूप; प्राथमिक शाळेच्या पुस्तकातून मुलांना शिक्षण

कृष्णवर्णीय म्हणजे कुरूप; प्राथमिक शाळेच्या पुस्तकातून मुलांना शिक्षण

Subscribe

प्राथमिक शाळेच्या पुस्तकात, यू अक्षराची व्याख्या कुरूप (U -Ugly) अशी देण्यात आली आहे.

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या निधनानंतर अमेरिकेसह बर्‍याच देशांमध्ये वर्णभेदाविरोधात मोठ्या प्रमाणात निषेध नोंदवण्यात येत आहे. अमेरिकेतून वर्णद्वेषाबद्दल उठलेला आवाज आता भारतातील पश्चिम बंगाल पर्यंत पोहोचला आहे. प्राथमिक शाळेच्या पुस्तकात काळ्या लोकांना कुरुप बोलण्यावरुन वाद सुरू झाला आहे.

प्राथमिक शाळेच्या पुस्तकात, यू अक्षराची व्याख्या कुरूप (U -Ugly) अशी देण्यात आली आहे. या शब्दाशी कृष्णवर्णीय माणसाचे चित्र दाखवलं आहे. यावर मुलांच्या पालकांनी आक्षेप घेतला आहे. पालकांचं म्हणणं आहे की मुलांच्या वर्णमाला आणि शब्दांच्या पुस्तकात, यू अक्षराची व्याख्या कुरूप (U -Ugly) अशी देण्यात आली आहे आणि एका कृष्णवर्णीय व्यक्तीचं चित्र लावण्यात आलं आहे, जे चुकीचं आहे. यू – कुरूप (U -Ugly) हा वाद पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून सुरू झाला आहे. बर्दवान जिल्ह्यातील सरकारी अनुदानित म्युनिसिपल गर्ल्स हायस्कूलमध्ये या पुस्तकाच्या माध्यमातून पूर्व-प्राथमिक वर्गातील मुलांना इंग्रजी वर्णमाला आणि शब्द शिकवले जात आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – आर्थिक संकटाशी लढतानाच आपण मोडून पडू अशी भीती वाटते – रोहित पवार


निषेध करणार्‍या पालकांपैकी एक सुदीप मजूमदार म्हणाले की माझी मुलगी मनपा गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकते. त्यांना कृष्णवर्णीय माणसांना कुरूप शिकवलं जात आहे, हे चुकीचं आहे. हे पुस्तक मागे घ्यावं. जर तसं झालं नाही तर कृष्णवर्णीय माणसांबद्दल मुलांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होईल. या प्रकरणात शालेय प्राथमिक शिक्षण जिल्हा निरीक्षक स्वपनकुमार दत्त यांनी कॅमेर्‍यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. तथापि असं शिक्षण देणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले. हे सरकारने जारी केलेलं पुस्तक नाही आहे. मी शाळेशी चर्चा करेन आणि गरज पडल्यास पुस्तक बदलू, असं ते म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -