घरदेश-विदेशUkraine Crisis : फ्रान्सच्या प्रयत्नानंतर अखेर Biden आणि Putin भेटीसाठी तयार, पण...

Ukraine Crisis : फ्रान्सच्या प्रयत्नानंतर अखेर Biden आणि Putin भेटीसाठी तयार, पण आहे ही अट

Subscribe

इम्यॅनुअल मॅक्रोन यांनी युरोपमधील शांती आणि सुरक्षेसाठी पुतिन आणि बायडेन यांच्याशी अनेकदा युक्रेन स्थितीवर चर्चा केलीय. रशिया युक्रेनवर हल्ला करणार नाही, असं आश्वासन पुतिन यांनी मॅक्रोन यांना दिलं होतं. दुसरीकडे रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करेल, अशी अमेरिकेला चिंता सतावत होती.

पॅरिसः यूक्रेन आणि रशियादरम्यान तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती कमी करण्यासाठी युरोपमधील अनेक देशांचे प्रयत्न सुरू आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅनुअल मॅक्रोन यात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. रविवारी फ्रान्सच्या राष्ट्रपती भवनाकडून एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आलंय, ज्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन भेटीसाठी तयार असल्याचं सांगितलं जात आहे. बायडेन आणि पुतिन शिखरवार्तेसाठी तयार झालेत. मॅक्रोन यांनी आपल्या प्रस्तावात युरोपमध्ये सुरक्षा आणि रणनीतिक स्थिरता कायम ठेवण्यासाठी चर्चा केलीय. जर रशियानं युक्रेनवर हल्ला करणार नसेल तर ही ही चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलंय.

इम्यॅनुअल मॅक्रोन यांनी युरोपमधील शांती आणि सुरक्षेसाठी पुतिन आणि बायडेन यांच्याशी अनेकदा युक्रेन स्थितीवर चर्चा केलीय. रशिया युक्रेनवर हल्ला करणार नाही, असं आश्वासन पुतिन यांनी मॅक्रोन यांना दिलं होतं. दुसरीकडे रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करेल, अशी अमेरिकेला चिंता सतावत होती. राष्ट्रपती मॅक्रोननं बायडेन आणि पुतिन यांना युक्रेन संकटाशी संबंधित हित लक्षात घेता शिखरवार्ता करण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्यात युरोपची सुरक्षा आणि रणनीतिक स्थिरतेवर चर्चा करण्यात आलीय.

- Advertisement -

विशेष म्हणजे बायडेन आणि पुतिन दोघांनीही या समीटसाठी परवानगी दिलीय. या समिटच्या तयारीसाठी 24 फेब्रुवारीला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन आणि रशियाचे सर्गेई लावरोवही भेटणार आहेत. यादरम्यान शिखर चर्चेचा मसुदा तयार केला जाणार आहे. रशियाचे राष्ट्रपती इम्यॅनुअल मॅक्रॉन सर्व पक्षांशी मिळून युक्रेन संकटावर शिखर चर्चेदरम्यान विषय तयार करणार आहेत.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन रविवारी म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष बायडेन युद्धाची स्थिती टाळण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्याशी कोणत्याही अटीवर चर्चा करण्यास तयार आहेत. ब्लिंकन म्हणाले, पुतिन यांनी जवळपास हल्ल्याची पूर्ण तयारी केलीय, जोपर्यंत टँक खरोखर पुढे सरकत नाही, विमानं उड्डाण भरत नाही, तोपर्यंत आम्ही चर्चेचे प्रयत्न करणार आहोत. ही कूटनीती राष्ट्रपती पुतिन यांचे पाऊल पुढे जाण्यापासून रोखणार आहे. ते म्हणाले की, जर खरोखर युद्ध टळणार असेल तर राष्ट्रपती बायडेन कोणत्याही शर्थीवर चर्चा करण्यासाठी तयार आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -