Dadasaheb Phalke Awards 2022 : ‘पुष्पा’ ठरला फिल्म ऑफ इयर; रणवीर ‘बेस्ट अॅक्टर’ तर कृती सेनन ‘बेस्ट एक्ट्रेस’

सिनेमापासून टीव्हीपर्यंत मनोरंजन विश्वातील चमकदार कामाचे कौतुक करत विविध श्रेणींमध्ये हा पुरस्कार प्रधान करण्यात आला.

Dadasaheb Falke International Film Festival Awards 2022 kriti sanon and ranveer singh bag awards for best actor and actress and Allu Arjuns Pushpa bags Film Of The Year
Dadasaheb Phalke Awards : 'पुष्पा'ला फिल्म ऑफ ईअर; रणवीर सिंहला बेस्ट अॅक्टर अवॉर्ड, तर कृती सेननला बेस्ट एक्ट्रेसचा पुरस्कार

Dadasaheb Falke International Film Festival Awards : दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 रविवारी (20 फेब्रुवारी) मुंबईत पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही सिनेविश्वातील सर्वोत्कृष्ट कलाकार आणि चित्रपटांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. सिनेमापासून टीव्हीपर्यंत मनोरंजन विश्वातील चमकदार कामाचे कौतुक करत विविध श्रेणींमध्ये हा पुरस्कार प्रधान करण्यात आला आहे.

रणवीर सिंग आणि क्रिती सॅनन ठरले बेस्ट अॅक्टर अँड एक्ट्रेस

बॉलिवूडमधील सर्वात टॅलेंटेड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ’83 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (Best Actor) म्हणून रणवीर सिंगची निवड करण्यात आली. या चित्रपटातील रणवीरच्या लूकची आणि त्याच्या अभिनयाचे आजही कौतुक केले जाते. त्याचवेळी क्रिती सेननला तिच्या ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (Best Actress) हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. या चित्रपटात तिने सरोगेट आईची भूमिका साकारली होती.

पुष्पा: द राइज ठरला ‘Film Of The Year’

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ( Film Of The Year) चा बहुमान मिळवला आहे. बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केले.

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी:

–  सर्वोत्कृष्ट चित्रपट – ‘पुष्पा’
– सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीर सिंग
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – क्रिती सॅनन
– क्रिटिक बेस्ट फिल्म- सरदार उधम
– क्रिटिक बेस्ट अॅक्टर- सिद्धार्थ मल्होत्रा
– क्रिटिक बेस्ट अॅक्ट्रेस- कियारा आडवाणी
– सर्वोत्कृष्ट चित्रपट – शेरशाह
– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – केन घोष
– चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट योगदान – आशा पारेख
– सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता – सतीश कौशिक
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लारा दत्ता
– सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेतील अभिनेता – आयुष शर्मा
– पीपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिमन्यू दासानी
– पीपल्स चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – राधिका मदान
– सर्वोत्कृष्ट पदार्पण – अहान शेट्टी
– सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म – अनादर राऊंड
– सर्वोत्कृष्ट वेब सिरीज – कँडी
– सर्वोत्कृष्ट वेब सिरीज अभिनेता – मनोज बाजपेयी
– सर्वोत्कृष्ट वेब सिरीज अभिनेत्री – रवीना टंडन
– वर्षातील दूरचित्रवाणी मालिका – अनुपमा
– मालिका सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहीर शेख
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री टिव्ही- श्रद्धा आर्या
– मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्ट्रेस टिव्ही सीरियल – रुपाली गांगुली
– मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर टिव्ही सीरियलर – धीरज धूपर
– सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म – ‘पौली’
– सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष – विशाल मिश्राऑ
– सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – कनिका कपूर
– सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर – जयकृष्ण गुम्मडी

विविध चित्रपट आणि कलाकारांना विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सिद्धार्थ मल्होत्राच्या शेरशाह या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्राला क्रिटिक्स बेस्ट अॅक्टर म्हणून गौरव करण्यात आला तर कियारा अडवाणीला क्रिटिक्स बेस्ट अवॉर्ड देण्यात आला. तर क्रिटिक्स बेस्ट फिल्म म्हणून ‘सरदार उधम’ची निवड झाली आहे.


Sidharth Malhotra पाहून लाजली Kiara Advani, भर कार्यक्रमात मारली मिठी