घरCORONA UPDATECoronaCrisis: भारताच्या आर्थिक धोरणाचे संयुक्त राष्ट्र संघाने केले कौतुक

CoronaCrisis: भारताच्या आर्थिक धोरणाचे संयुक्त राष्ट्र संघाने केले कौतुक

Subscribe

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन असताना आलेल्या आर्थिक संकटात मोदी सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. मोदी सरकारच्या या आर्थिक धोरणाचे जगभरात कौतुक होत आहे. संयुक्त राष्ट्र संघातील तज्ज्ञांनीदेखील भारताचे धोरण प्रभावी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तज्ज्ञांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या संकटात अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी आतापर्यंत सर्वाधिक मोठे आर्थिक पॅकेज जाहीर करणारा हा पहिला देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती.

भारताचा निर्णय योग्य 

जागतिक आर्थिक देखरेख शाखेचे प्रमुख हामिद रशीद यांनी बुधवारी जगातील आर्थिक स्थितीचा आढावा अहवाल सादर केला. त्यावेळी त्यांनी भारताच्या आर्थिक धोरणाचे कौतुक केले. भारताने घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य असून विकसनशील देशाकडून घेण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताने जाहीर केलेले हे पॅकेज खुप मोठे आहे. भारताकडे अंतर्गत आर्थिक बाजारपेठ असून या पॅकेजचा फायदा घेऊ उद्योगधंद्याला उभारी देण्याची क्षमताही आहे.

- Advertisement -

काय आहे आर्थिक धोरण 

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत या पॅकेजची घोषणा करताना नरेंद्र मोदी यांनी हे पॅकेज भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) १० टक्के इतके असल्याचे सांगितले.

हेही वाचा –

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांच्यात चर्चा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -