घरताज्या घडामोडीUnion Budget 2021: अर्थसंकल्पातील सर्व योजना एका क्लिकवर

Union Budget 2021: अर्थसंकल्पातील सर्व योजना एका क्लिकवर

Subscribe

चहा मळ्यातील कामगारांसाठी मोठी घोषणा

संसदेत आज अर्थसंकल्प २०२१ (Union Budget 2021) सादर करण्यात आले आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेट सादर केले आहे. कोरोना संकटानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प होता. यामुळे देशातील नागरिकांना बजेटमधून मोठ्या सवलमी मिळती अशी अपेक्षा होती. अर्थसंकल्प जाहीर होताना बहुतांश जनतेची सोयी आणि सुविधांवर लक्ष केंद्रित केले होते. परंतु या बजेटमध्ये करसवलतींमध्ये काही सूट देण्यात आली नाही. परंतु आरोग्य क्षेत्रात तसेच रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने मोठ्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. तसेच काही योजना राबविण्यात येत आहेत तर काही योजानांमध्ये बदल करण्यात आले आहेत. देशासाठी जलजीवन योजना, आरोग्य आणि कल्याण योजना, स्वच्छ भारत अभियान, शुद्ध वायू आणि शुद्ध पाणी योजना सुरु करण्याची घोषणा तसेच तरतूदी करण्यात आल्या आहेत. चहा मळ्यातील कामगारांसाठी मोठी घोषणा केली आहे.

जल जीवन योजना

केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी सोमवार १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प २०२१ सादर केला आहे. या बजेटमध्ये देशातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. ही योजना जल जीवन योजना असून यासाठी २ लाख ८७ हजार कोटींची तरतूद केली असल्याचे निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

देशातील ग्रामीण भागात पाणी टंचाई भासते आणि दुषित पाण्याचे सेवन करावे लागते. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात जल जीवन योजना राबविण्यात आली आहे. या योजनेचा लाभ ६ कोटी लोकांना होणार आहे. या योजनेतून कोट्यावधी नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच या योजनेतून २७८ लाख कुटुंबामधील ६ कोटी लोकसंख्येला घरात शुद्ध पाणी पुरवण्यात आले आहे.

स्वस्थ भारत, आरोग्य क्षेत्र

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात स्वस्थ भारत ह्या नव्या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेसाठी ६४,१८० करोड रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना ६ वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेत प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय असे तीन टप्प्यात विभागली आहे. स्वस्थ भारत योजना राष्ट्रीय संस्थांना उभारी देल आणि अजारांवर उपचार करण्यासाठी नवीन संस्था करण्यास मदत करणार आहे.

- Advertisement -

या योजनेंतर्गत आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये उभारण्यात येणर आहेत. तसेच प्रयोगशाळा, अत्यावश्यक सेवा रुग्णालय, विषाणूंच्या परिक्षणासाठी ४ केंद्रे उपलब्ध करण्यात येणार आहे.

क्लीन एयर

देशातील हवा प्रदुषणाची पातळी दिवसेंदिवस घसरते आहे. त्यामुळे देशाती हवेची पातळी सुधारण्यासाठी क्लीन एयर ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जुन्या वाहनांना भंगारात काढण्यात येणार आहे. तसेच खासगी वाहनांची २० तर व्यावसायिक वाहनांना १५ वर्षांनतर भंगारात काढली जाणार आहेत. असे केल्याने इंधनाची बचत होईल आणि पर्यावरणाची हानी होण्यापासून रोखले जाऊ शकते. असे बजेट २०२१ सादर करताना अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

चहा मळ्यातील कामगारांसाठी मोठी घोषणा

असाम आणि पश्चिम बंगालमध्ये आगामी महिन्यांत निवडणूका होणार आहे. त्यामुळे या दोन राज्यांवर योजानंची खैरात दिली आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमधील चहाच्या मळ्यातील कामगारंसाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या राज्यात सर्वाधिक चहा कामगार असल्यामुळे निवडणूकीमध्ये मतदारांना आकर्षित करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -