घरताज्या घडामोडीगिरीश प्रभुणे यांच्या प्रकरणावर तात्काळ तोडगा काढा - नीलम गोऱ्हे

गिरीश प्रभुणे यांच्या प्रकरणावर तात्काळ तोडगा काढा – नीलम गोऱ्हे

Subscribe

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले गिरीश प्रभुणे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून थकित करासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांना पाठवलेल्या नोटीससंदर्भात माहिती दिली. केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेले सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांना पिंपरी चिंडवड महापालिकेने मालमत्ता कराची नोटीस पाठवली आहे. याची माहिती मिळताच डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. तसेच याबाबत तात्काळ तोडगा काढण्यासाठी आयुक्तांना निर्देश दिले. डॉ. गोऱ्हे यांनी प्रभुणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली आणि मालमत्ता जप्तीची कोणत्याही प्रकारची कारवाई पिंपरी चिंचवड मनपाकडून होणार नाही, असे आश्वासन दिले.

यात २००० चौरस फुटाच्या पुढे प्रभुणे यांच्या संस्थेचे बांधकाम असल्याने त्यांना मालमत्ता कर हा शासनाच्या नियमाप्रमाणे दुपटीने आकारला आहे. त्यांची शैक्षणिक संस्था खूप जुनी असल्याने नवीन नियमाप्रमाणे ब्लु लाईनच्या आत आली आहे, असे असल्याने संस्थेचे बांधकाम अधिकृत होऊ शकत नाही. यामुळे सर्वसामान्यांना ५००० अनधिकृत बांधकामांना ज्याप्रकारे नोटीस दिली गेली आहे त्यातील सदर नोटीस आहे. त्याचप्रमाणे आर्थिक वर्ष संपत असल्याने मालमत्ता कराबाबत नोटीस दिली असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले.

- Advertisement -

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला महापालिकेची मालमत्ता कर भरण्यासंबंधी नोटीस आली आहे. रुपये १ कोटी ८३ लाख रुपयांचा मालमत्ता कर भरण्याची ही नोटीस आहे. २१ जानेवारी रोजी महापालिकेडून ही नोटीस पाठवण्यात आली होती आणि त्यानंतर २५ जानेवारीला प्रभुणे यांना पद्मश्री जाहीर झाला होता.

याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तांना निर्देश देताना सांगितले की, प्रभुणे हे समाजहिताचे आणि समाजप्रबोधनाचे काम करत आहेत, असे असताना प्रभुणे यांच्या संस्थेला जप्तीची नोटीस काढली आहे, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. नोटीस काढण्याअगोदर प्रभुणेंना भेटून अधिकाऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढला असता तर विनाकारण मनपा विरोधात वाद निर्माण झाला नसता असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. याघटनेत तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

- Advertisement -

हेही वाचा – गिरीश प्रभुणेंच्या संस्थेला बजावलेली नोटीस अखेर स्थगित!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -