घरCORONA UPDATEदेशात कुठेही मालवाहतूक आणि फिरण्यासाठी ई पासची आवश्यकता नाही - केंद्र सरकार

देशात कुठेही मालवाहतूक आणि फिरण्यासाठी ई पासची आवश्यकता नाही – केंद्र सरकार

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. केंद्राने नुकतेच अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यातील नियमावली जारी केली असून त्यानुसार राज्यांना प्रवासी तसेच माल वाहतुकीवरील बंदी हटवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. या बंदीवरून केंद्राने राज्यांना फटकारले असून त्वरीत ही बंदी उठवण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी पत्र लिहून राज्यातील आणि राज्याराज्यातील प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृहसचिवांनी या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक ३ च्या नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले आहे. राज्यातंर्गत वा राज्याराज्यातील वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची बंधन असायला नको. राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर प्रवासी वाहतुकीवर लादण्यात आलेल्या बंधनाचा परिणाम राष्ट्रीय स्तरावरील मालाच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवरही झाला आहे. विस्कळीत व्यवहारांचा परिणामुळेच बेरोजगारी देखील वाढत आहे, असे नमूद केले आहे.

पुढे केंद्रीय गृहसचिव म्हणाले की,

राज्यांना अनलॉक ३ नियमावलीचा संदर्भ देत नियमावलीतील पाचव्या परिच्छेदाचा उल्लेख त्यांनी केला आहे. प्रवासी आणि माल वाहतुकीवर कोणतीही बंधन असणार नाही. त्याचबरोबर शेजारील देशांशी करारानुसार सीमापार व्यापार करण्यासाठीही स्वतंत्र परवानगी व ई-परमिटची गरज भासणार नाही. जिल्हा प्रशासनासह विविध पातळीवर हालचालींवर निर्बंध लादले असल्याचे अहवाल केंद्राकडे आले आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारे वाहतुकीवर बंधन घालण्यात आले आहे. परिणामी वस्तू व मालाच्या पुरवठा साखळीवर होत आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

‘बबड्यासाठी आई एवढं तर करणारच’; मनसेचा महापौरांना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -