घरमुंबई'बबड्यासाठी आई एवढं तर करणारच'; मनसेचा महापौरांना टोला

‘बबड्यासाठी आई एवढं तर करणारच’; मनसेचा महापौरांना टोला

Subscribe

कोरोना सेंटर उभारणीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनेसेने पत्रकार परिषद घेत केला. हे प्रकरण मनसेने लावून धरले आहे. कोरोना सेंटरचे कंत्राट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:च्या मुलाच्या कंपनीला दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसेचे हे आरोप किशोरी पेडणेकर यांनी फेटाळून लावले आहेत. मात्र, मनसेने त्यांचा आक्रमक पवित्रा सोडलेला नाही. मनसेचे नेते सातत्याने महापौर आणि शिवसेनेवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, मनसेचे नेते संतोष धूरी यांनी महापैरांना जोरदार टोला हाणला आहे.

संतोष धूरी यांनी ट्विट करत महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. “मी, माझं आणि मलाच. आई बबड्यासाठी एव्हढ तर करणारच,” असे ट्विट संतोष धूरी यांनी केले आहे.

- Advertisement -

तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील ट्विट करत पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “महापौरांच्या मुलाला कंत्राट मिळणे गैर नाही पण महापौरांच्या मुलालाच कंत्राट मिळणे गैर,” अशा आशयाचे ट्विट देशपांडे यांनी केले.

- Advertisement -

मुंबईतील कोरोना सेंटर उभारणीची कंत्राटे महापौर किशोरी पेडणेकर यांनी पदाचा गैरवापर करत स्वत:च्या मुलाला दिली, असा आरोप मनसेने पत्रकार परिषद घेत केला. कोरोनाच्या आपत्कालीन संकटाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून कोणत्याही प्रकारे निविदा न काढता कामांचे वाटप केले जात आहे. कामांची कंत्राटे आपल्या जवळील लोकांना कोणताही अनुभव नसताना दिली जातात. हा भ्रष्टाचार समोर येऊ नये यासाठी सभागृह चालू देत नाही आहेत, असा आरोप मनसेने केला आहे.


हेही वाचा – असलं कसलं पब्जीचं वेड; टास्क पूर्ण झाला नाही म्हणून आत्महत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -