घरदेश-विदेशउन्नाव बलात्कार : आरोपी भाजप आमदाराची पक्षातून हकालपट्टी

उन्नाव बलात्कार : आरोपी भाजप आमदाराची पक्षातून हकालपट्टी

Subscribe

उन्नाओ बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एकीकडे सरकारी पक्षाची कानउघाडणी केली असतानाच दुसरीकडे भाजपनं मुख्य आरोपी भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

राजकीय वर्तुळ, सामाजिक असंतोष आणि पोलिसी दबाव या पार्श्वभूमीवर अखेर उत्तर प्रदेशमधल्या बहुचर्चित उन्नाव बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणातील पीडितेच्या गाडीला अपघात झाला होता. त्यामध्ये तिची मावशी आणि काकू अशा दोन महिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भाजपवर सर्वच स्तरांतून कुलदीप सिंह सेंगर यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर अखेर सेनगर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, पीडितेच्या अपघाताची गंभीर दखल घेण्यात आली असून सीबीआयने त्याची चौकशी सुरू केली आहे.

ते पत्र लगेच मला का दाखवलं नाही? – सरन्यायाधीश रंजन गोगोई

मागील वर्षी एप्रिल महिन्यात उन्नावमध्ये एका महिलेने सत्ताधारी भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर यांच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात तिने तक्रार देखील दाखल केली होती. याप्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पीडितेने आपल्या जिवाला धोका असल्याचं एका पत्राद्वारे पोलिसांना कळवलं होतं. मात्र, ते पत्रच सर्वोच्च न्यायालयात सादर न केल्यामुळे न्यायालयाने गुरुवारी सरकारी पक्षाचे कान उपटले. ‘१७ जुलै रोजी हे पत्र पीडितेने पाठवले असून तरीदेखील ते लगेच न्यायालयासमोर का सादर करण्यात आले नाही?’ असा थेट सवालच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केला. ‘वर्तमानपत्रांमध्ये या पत्रावर सर्वोच्च न्यायालय मौन बाळगून असल्याचं मी वाचलं. त्यामुळे मी व्यथित झालो आहे’, असं देखील ते म्हणाले.

- Advertisement -

अपघात प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

दरम्यान, २९ जुलै रोजी रायबरेलीच्या गुरबख्श गंज भागामध्ये पीडित तरुणीच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिची काकू आणि मावशी अशा दोन महिलांचा मृत्यू झाला होता, तर कारचा चालक आणि खुद्द पीडित तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्या वकिलांनाही या अपघातात गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, हे प्रकरण आता सीबीआयने हाती घेतले असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. यात दोषी ट्रकचालक, मालक आणि क्लीनरला अटक देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि इतर १० जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या वडिलांना याआधीच एका प्रकरणात अटक केल्यानंतर तुरुंगात असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -