घरताज्या घडामोडीLockDown: दारूची दुकाने उघडल्यानंतर 'या' राज्यात पान मसाल्यावरील बंदी हटवली

LockDown: दारूची दुकाने उघडल्यानंतर ‘या’ राज्यात पान मसाल्यावरील बंदी हटवली

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारने २५ मार्च रोजी पान मसाला आणि गुटख्यावर बंदी घातली होती. मात्र आता दारूची दुकाने उघडल्यानंतर योगी सरकारने पान मसाल्यावरील बंदी हटवली आहे.

देशातला कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवला आहे. लॉकडाऊनच्या या तिसऱ्या टप्प्यात सरकारने काही भागात सोमवारपासून दारू विक्री करण्यास परवानगी दिली. त्यानंतर दारूच्या दुकानांबाहेर मद्यप्रेमींची लांबच लांब रांग पाहायला मिळाली. दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये दारूची दुकाने उघडल्यानंतर योगी सरकारने आता पान मसाला तयार करण्यावरील बंदी हटवली आहे, असे एका अधिकृत आदेशानुसार समोर आले आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम ३०/२ अंतर्गत २५ मार्च रोजी पान मसाला आणि गुटाख्यावर बंदी घातली होती. राज्यात गुटखा तयार करणे आणि साठवणे यासह विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. लोक पान मसाले, गुटखा खातात आणि सरकारी कार्यालय, बाजारपेठेत आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकतात, असा सरकारचा विश्वास होता. ज्यामुळे घाण पसरते आणि कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका देखील वाढू शकतो. म्हणून पुढील आदेश येईपर्यंत अन्नधान्य व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी पान मसाल, गुटख्यावर बंदी घालण्याबाबत आदेश जारी केला होता.

- Advertisement -

मात्र आता अन्नधान्य व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अनिता सिंग यांनी बुधवारी जाहीर केलेल्या आदेशात सांगितले की, २५ मार्च रोजी लावण्यात आलेल्या पान मसाला तयार करण्यावरील आणि विक्रीवरील बंदी हटवण्यात आली आहे. पण निकोटीनयुक्त मसाल्यांवरील आणि तंबाखूसह गुटखा यावरील बंदी कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा – ‘त्या’ महिलेने केली मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याची हत्या; कारण ऐकून बसेल धक्का

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -