घरAssembly Battle 2022मांसविक्रीची दुकाने दिसता कामा नयेत, राम राज्य हवयं- निवडून येताच भाजप आमदाराचा...

मांसविक्रीची दुकाने दिसता कामा नयेत, राम राज्य हवयं- निवडून येताच भाजप आमदाराचा इशारा

Subscribe

निवडणुकीचे निकाल जाहीर होताच गुर्जर यांनी सरकारी अधिकाऱ्यांना लोणीमध्ये एकही मांसविक्रीचे दुकान दिसता कामा नये असा धमकीवजा इशारा दिला.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळाले असून लवकरच सरकार स्थापन होणार आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याचदरम्यान, गाजियाबादमधील लोणी येथे दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार नंदकिशोर गुर्जर यांच्या विधानाने युपीमध्ये खळबळ उडाली आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच गुर्जर यांनी सरकारी अधिकाऱ्यांना लोणीमध्ये एकही मांसविक्रीचे दुकान दिसता कामा नये असा धमकीवजा इशारा दिला.

तसेच लोणीमध्ये राम राज्य हवंय यामुळे दूध तूप खा आणि दंडबैठका मारा असेही गुर्जर अधिकाऱ्यांना म्हणाले.  या आधीही निवडणूक प्रचारादरम्यान वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुर्जर चर्चेत आले होते. जानेवारीमध्ये लोणी येथील बहेता हाजीपूर गावात निवडणूक प्रचारावेळी गुर्जर यांनी जी लोकं अलीचे नाव घेतात त्यांनी पाकिस्तानमध्ये जायला हवं असं विधान केलं होते. तसेच समाजवादी पार्टीचे दहशतवादी संघटना असलेल्या हिजबुल मुजाहिदीनबरोबर कनेक्शन असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.

- Advertisement -

तसेच अलीचे नाव घेणाऱ्यांनी लोणी सोडून जायला हवं. या निवडणूकीनंतर लोणीमध्ये रामराज्य असेल असाही दावा त्यांनी त्यावेळी केला होता. तसेच समाजवादी पार्टी ही पाकिस्तानी पार्टी असल्याचंही ते म्हणाले होते. गुर्जर यांच्या या विधानावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. पण गुर्जर यांनी आपल्याला आपल्या विधानावर कोणताही पश्चाताप होत नसल्याचे ठामपणे सांगितलं होंत. त्यानंतर आता ते लोणीमधून पुन्हा एकदा निवडून आले आहेत. पण निवडून येताच त्यांनी वादग्रस्त विधान करण्यास सुरुवात केली. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार ्सल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -