घरताज्या घडामोडीपोस्टात पैसे जमा करत आहात का? मग हे वाचा

पोस्टात पैसे जमा करत आहात का? मग हे वाचा

Subscribe

जर तुम्हीदेखील पोस्टातील बचत खात्यात नियमित पैसे जमा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण बजेटच्या आधी तुम्हाला पोस्टातर्फे देण्यात आलेल्या मॅग्नेटीक कार्डच्या जागी नवीन ईव्हीएम चिप असलेले कार्ड बदलून घ्यावे लागणार आहे. अन्यथा ३१ जानेवारीपासून तुमचे जुने एटीएम कार्ड रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या महिनाअखेर पर्यंत तुमचा मोबाईल क्रमांकही पोस्टात अपटेड करावा लागणार आहे.

भारतीय पोस्ट कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार ३१ जानेवारीपर्यंत जर तुम्ही एटीएम कार्ड आणि मोबाईल क्रमांक अपटेड केला नाहीत तर तुमचे कार्ड ब्लॉक केले जाणार आहे. तसेच मोबाईल क्रमांक अपटेड करण्यासाठीही धावाधाव करावी लागणार आहे. पोस्टाबरोबरच इतर बँकांनीही आपली मॅग्नेटीक कार्ड सुरक्षित ईएमवी चिप असलेल्या एटीएम कार्डशी बदलून दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -