थरारक व्हिडिओ : कुत्र्याने विद्यार्थ्यावर केला हल्ला; विद्यार्थी जखमी

एका पाळीव कुत्र्याने १५ वर्षाच्या विद्यार्थ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमध्ये विद्यार्थी जखमी झाला आहे.

punjab jalandhar pitbull attack teen locals struggle to rescue him viral video
कुत्र्याने विद्यार्थ्यावर केला हल्ला

एका पाळीव कुत्र्याने १५ वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना पंजाब मधील जालंधर येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. या सीसीटीव्हीत एक पाळीव कुत्रा एका मुलावर हल्ला करताना दिसत आहे. तसेच त्यांनी मुलाच्या पायाला पकडले असून त्याच्या जबड्यातून मुलाला सोडवण्यासाठी आजूबाजूची माणसे अनेक प्रयत्न करत आहेत. मात्र, तरी देखील तो कुत्रा त्या मुलाला सोडत नसल्याचे दिसत आहे.

#viralvideo #28jan #pitbul #dogattack #13yrsboy #puriyamohalla #maihirangate #jalandhar #banpitbul #stopattackingPitbul dog attacked 13yrs old boy in puriya mohalla, mai hiran gate, jalandhar.ट्यूशन से लौट रहे बच्चे पर पिटबुल का हमला, लोग डंडे-पत्थरों से पीटते रहे, लेकिन कुत्ते ने बच्चे को नहीं छोड़ा, बच्चा गंभीर रूप से हुआ जख्मी, ये वीडियो जालंधर के माई हीरा गेट के पास पड़ते पुरिया मोहल्ला की बताई जा रही है ।

Jagroop Roop PTC News ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಜನವರಿ 28, 2020

काय आहे या व्हिडिओत

जालंधर येथे एक १५ वर्षाचा मुलगा क्लासवरुन सुटल्यानंतर आपली सायकल घेऊन रस्त्याने घरी जाताना दिसत आहे. त्या दरम्यान, त्या ठिकाणी असलेल्या एका पाळीव कुत्र्याने त्या मुलावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्या कुत्र्याने मुलाच्या पायाला पकडले असून त्या कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी मुलगा अनेक प्रयत्न करत आहे. मात्र, तरी देखील तो कुत्रा त्याची सुटका करत नाही. ही घटना पाहून आजूबाजूच्या लोकांनी त्या कुत्र्याला काठी आणि दगडानी मारहाण केली आहे. मात्र, तरी देखील त्या कुत्र्याने त्याची सुटका केलेली नाही. त्यामुळे हतबल झालेल्या एका व्यक्तीने त्या कुत्र्याच्या अंगावर पाणी देखील ओतल्याचे दिसत आहे. मात्र, तरी देखील तो कुत्रा त्या मुलाला सोडत नाही. या हल्ल्यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मुलाच्या आई – वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.


हेही वाचा – NRC: नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी राखी सावंतने दिलाय रामबाण उपाय