घरदेश-विदेशचीनविरोधात अमेरिका आक्रमक; ट्रम्प यांची हाँगकाँग स्वायत्तता कायद्यावर स्वाक्षरी

चीनविरोधात अमेरिका आक्रमक; ट्रम्प यांची हाँगकाँग स्वायत्तता कायद्यावर स्वाक्षरी

Subscribe

अमेरिका आणि चीनमधील मतभेदाची दरी अधिक खोल होत चालली आहे. अमेरिका चीनविरोधात आक्रमक झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर कठोर निर्बंध घालण्याच्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. यासह हाँगकाँगला व्यापारासाठी देण्यात आलेला विशेष दर्जाही काढून घेण्यात आला आहे. ट्रम्प यांनी हाँगकाँगमधील दडपशाहीच्या कारवायांविरोधात आणि अत्याचारांसाठी चीनवर आरोप केले होते.ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधला.

“हाँगकाँगच्या लोकांविरुद्ध चीनने केलेल्या अत्याचाराविरोधात चीनला जबाबदार धरण्यासाठी मी आज कायदा आणि आदेशावर स्वाक्षरी केली. हाँगकाँगमध्ये जे काही घडत आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. अशा परिस्थितीत त्यांची स्वायत्तता संपवणं योग्य नाही. आम्ही चिनी तंत्रज्ञान आणि दूरसंचार प्रदात्यांचा सामना केला. सुरक्षेच्या कारणास्तव, अनेक देशांना आम्हाला हे पटवून द्यावं लागलं की हुआवै धोकादायक आहे. आता ब्रिटननेही त्यांच्यावर बंदी घातली आहे,” असं ट्रम्प म्हणाले.

- Advertisement -

ट्रम्प पुढे म्हणाले, “हाँगकाँगमध्ये काय घडलं हे आम्ही पाहिलं. मुक्त बाजारात स्पर्धा होऊ नये म्हणून त्यांचं स्वातंत्र्य काढून घेण्यात आलं. मला असं वाटतं की बरेच लोक आता हाँगकाँग सोडत आहेत. आम्ही खूप चांगला स्पर्धक गमावला आहे. आम्ही त्यांच्यासाठी बरंच काही केलं.” आता हाँगकाँगला कोणताही विशेष दर्जा दिला जाणार नाही. हाँगकाँगलाही चीनप्रमाणेच वागवलं जाईल. अमेरिकेचा फायदा चीनने घेतला. परंतु त्याच्या मोबदल्यात विषाणू दिला. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलं, असंही ट्रम्प म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -