घरट्रेंडिंगकिसान क्रांती पदयात्रा: शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पाण्याचे फवारे

किसान क्रांती पदयात्रा: शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पाण्याचे फवारे

Subscribe

पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर करत पोलीस शेतकऱ्यांच्या जमावाला राजधानी दिल्लीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. 

भारतीय किसान युनियन सप्टेंबर महिन्याच्या २३ तारखेपासून ‘किसान क्रांती पदयात्रा’ सुरु केली होती. उत्तराखंडच्या हरिद्वारमधून सुरु झालेली ही किसान क्रांती पदयात्रा मंगळवारी (आज) दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर येऊन धडकली. मात्र, दिल्लीच्या सीमेवरच पदयात्रेतील शेतकऱ्यांना अडवत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांनी रोखण्यासाठी दिल्ली – मेरठ महामार्गावरील गाजीपूर सीमेवरील काही महत्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी केली आहे. त्यामुळे या मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस लाठीचार्ज तसंच वॉटरगनचा देखील वापर करत आहेत. पाण्याचे फवारे आणि अश्रूधुराचा वापर करत पोलीस शेतकऱ्यांच्या जमावाला राजधानी दिल्लीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाला विरोध दर्शविण्यासाठी ही किसान क्रांती पदयात्रा काढण्यात आली आहे.

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

कर्जमाफी, उसाला अपेक्षित असलेला वाढीव दर यासारख्या अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी या किसान क्रांती पदयात्रेचे आोजन केले आहे. एक नजर टाकूया शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्यांवर :

  • शेतकऱ्यांना वयाच्या साठीनंतर पेन्शन देण्याता यावे
  • पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यात यावा
  • ऊस दराची रक्कम त्वरित मिळावी
  • शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी
  • शेतीच्या कामांसाठी मोफत वीज देण्यात यावी
  • किसान क्रेडिट कार्डावर व्याजमुक्त कर्ज द्यावं
  • किसान स्वामीनाथ कमिटीचा रिपोर्ट लागू करण्याची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -