घरदेश-विदेशबलात्काराला विरोध केला म्हणून महिलेला जिवंत जाळले

बलात्काराला विरोध केला म्हणून महिलेला जिवंत जाळले

Subscribe

उत्तरप्रदेशमध्ये संभल जिल्ह्यात असणाऱ्या पाटक्कापूर या गावात एका महिलेला बलात्काराला विरोध केला म्हणुन जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये संभल जिल्ह्यातील पाटक्कापूर या गावात एका महिलेला बलात्काराला विरोध केला म्हणून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा ही घटना घडली. पीडित महीलेच्या घरात घुसून पाच अज्ञातांनी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेकडून झालेल्या विरोधामुळे तिला घरातच जिवंत जाळण्यात आले. सुमारे २२ लाख लोकसंख्या असलेल्या संभल जिल्ह्यात या घटनेमुळे अशांतता पसरली असून या घटनेचा लोकांकडून निषेध करण्यात येत आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पीडिताने पोलीसांना फोन केला होता

दरम्यान, ही घटना घडायच्या आधी पीडित महिलेने पोलीसांना १०० क्रमांकावर फोन केला होता. पण पोलिसांकडून तिला कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. यानंतर लगेचच तिने स्वत:च्या भावाला फोन करुन या प्रकाराची माहिती दिली. पण तिचा भाऊ घटनास्थळावर पोहोचायच्या आधीच तिला जिवंत जाळण्यात आले होते आणि यात तिचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून महिलेला या तरुणांकडून त्रास होत असल्याचीसुद्धा माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

तक्रार नोंदवल्यावर कारवाई करण्यात येईल

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून पीडितेच्या कुटुंबियांकडून या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात येईल आणि पुढील तपास करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सगितले आहे. एसपी आर. एस. भारद्वाज यांनी महिलेवर सामुहिक बलात्कार झाला नसल्याचा दावा केल्याने पोलीस आपल्या तपासात आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -