घरदेश-विदेशUttarakhand Election 2022: भाजपच्या 59 उमेदवारांची यादी जाहीर, सीएम धामी खटिमा येथून...

Uttarakhand Election 2022: भाजपच्या 59 उमेदवारांची यादी जाहीर, सीएम धामी खटिमा येथून लढणार

Subscribe

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने 59 पैकी 15 ब्राह्मण आणि 3 बनिया चेहऱ्यांना तिकीट दिले. दहा आमदारांची तिकिटे कापण्यात आली असून, चार अध्यात्मिक नेत्यांना तिकीट देण्यात आल्याचे सांगण्यात आले. सतपाल महाराज चौबत्ताखालमधून निवडणूक लढवणार आहेत.

नवी दिल्लीः BJP Candidate List 2022 Uttarakhand: भारतीय जनता पक्षाने (BJP) उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. यात 59 उमेदवारांची नावे आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना खटिमामधून उमेदवारी देण्यात आलीय. पुष्कर सिंह धामी हे खतिमा विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेत. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक हरिद्वारमधून निवडणूक लढवणार आहेत. उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. तेथे 14 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 10 मार्चला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

भाजपने 10 आमदारांची तिकिटे कापली

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपने 59 पैकी 15 ब्राह्मण आणि 3 बनिया चेहऱ्यांना तिकीट दिले. दहा आमदारांची तिकिटे कापण्यात आली असून, चार अध्यात्मिक नेत्यांना तिकीट देण्यात आल्याचे सांगण्यात आले. सतपाल महाराज चौबत्ताखालमधून निवडणूक लढवणार आहेत. उत्तराखंड महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरिता आर्य यांनी या आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांना नैनिताल येथून तिकीट देण्यात आले आहे. भाजपच्या वतीने प्रल्हाद जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. ते म्हणाले की, डबल इंजिनच्या सरकारने उत्तराखंडमध्ये 5 वर्षांत विकासाची कामे केली आहेत. ते म्हणाले की, हे दशक उत्तराखंडचे दशक आहे. जनतेची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही लोकांमध्ये जात आहोत.

- Advertisement -

त्रिवेंद्र सिंह रावत यांची विधानसभा निवडणूक न लढवण्याची इच्छा

उत्तराखंड विधानसभा निवडणूक 2022 च्या तिकिटावरून अनेक बड्या नेत्यांच्या नाराजीच्या बातम्या येत असतानाच त्याच दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलीय. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. राज्याचे मुख्यमंत्री असलेले आणि सध्या डोईवाला मतदारसंघाचे आमदार असलेले रावत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून यावेळी विधानसभा निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्रिवेंद्र सिंह रावत डोईवाला मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेत.


हेही वाचाः Goa Election 2022: उत्पल पर्रिकरांचे तिकिट भाजपने कापले, गोव्यातील ३४ उमेदवारांची यादी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -