घरAssembly Battle 2022Uttarakhand Election Results 2022 : उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचा पराभव

Uttarakhand Election Results 2022 : उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचा पराभव

Subscribe

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्त्वात भाजपला उत्तराखंडमध्ये प्रचंड बहुमत मिळाले असले तरी खतिमा विधानसभा जागेवरून पुष्कर सिंह धामी यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या जागेवर काँग्रेसचे उमेदवार भुवनचंद कापरी यांनी धामी यांचा सुमारे ६ हजार ९५१ मतांनी पराभव केला आहे. उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नसून इतर पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत.

भुवन कापरी कोण आहे?

भुवनचंद कापरी हे राज्यातील काँग्रेसचे युवा नेते आणि कार्याध्यक्ष आहेत. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले भुवनचंद कापरी हे उत्तराखंड युवक काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. त्यांनी उत्तराखंड प्रदेश काँग्रेसमध्ये सरचिटणीस पदही भूषवले आहे. भुवन कापरी यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीतही पुष्कर सिंग धामी यांना कडवी झुंज दिली होती. मात्र कापरी यांना अवघ्या 2709 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. भुवन कापरी यांना 26,830 मते मिळाली, तर पुष्कर सिंह धामी यांना 29,539 मते मिळाली होती.

- Advertisement -

शेतकरी आंदोलनाचा परिणाम

खातिमा विधानसभा मतदार संघ उधम सिंह नगर जिल्ह्यात येते. शेतकरी चळवळीचा येथे मोठा प्रभाव जाणवला होता. मात्र केंद्राने तीन कृषीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांमधील नाराजी संपेल, असे मानले जात होते. पुष्कर सिंह धामी यांनी 2012 मध्येही या जागेवरून निवडणूक जिंकली होती. यावेळी त्यांनी काँग्रेसचे देवेंद्र चंद यांचा पराभव केला होता. धामी यांचा विचार ही जागा पुन्हा जिंकून हॅट्ट्रिक करण्याचा होता. या जागेच्या समीकरणाबाबत बोलायचे झाले तर, या जागेवर मुस्लिम आणि शीख मतदारांची संख्या बऱ्यापैकी आहे. त्याच वेळी, थारू जमाती आणि पिथौरागढ, चंपावत, लोहघाट येथून स्थलांतरित झालेले लोकही येथे राहतात.

याशिवाय भगवानपुरमधून काँग्रेसचे उमेदवार ममता राकेश, देहराडून कॅन्टमधून भाजपचे उमेदवार सविता कपूर, सीतरगंजमधून भाजपचे सौरभ बहुगुणा काँग्रेसच्या नवतेज पाल सिंह यांच्यावर 10, 938 मतांच्या आघाडीने जिंकले आहे. सहासपूरमधून भाजपचे सहदेव पुंदीर 8,355 मतांच्या आघाडीने काँग्रेसच्या अरयंद्र शर्मा यांच्यावर विजय मिळवला.


Uttarakhand Election Results 2022 : माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा पराभव निश्चित; भाजप आघाडीवर
 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -