घरAssembly Battle 2022Punjab Election Result 2022 : सोनू सूदचा बहिणीला पाठिंबा नसल्याची चर्चा; मालविका...

Punjab Election Result 2022 : सोनू सूदचा बहिणीला पाठिंबा नसल्याची चर्चा; मालविका सूदचा पंजाबमध्ये पराभव

Subscribe

मालविका सूद ही काँग्रेस पक्षाची उमेदावर होती. मागच्या अनेक दिवसांपासून पंजाबमध्ये मालविका सूदच्या नावाची चर्चा होती. परंतु मालविकाचा पंजाबमध्ये निभाव लागू शकलेला नाही.

देशातील पाच राज्यातील निवडणूकांची मतमोजणी सुरू असून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला चांगलाच पाठिंबा मिळाला आहे. पंजाबमध्ये ११७ जागांसाठी मतमोजणी सुरू असून आम आदमी पार्टी या सगळ्यात पुढे आहे. पंजाबमध्ये यावेळी काँग्रेसला चांगलाच दणका बसला आहे. काँग्रेसमध्ये मोगा मतदारसंघातून उमेदवारी मिळाले्ल्या अभिनेता सोनू सूदच्या बहिणीचा देखील पराभव झाला आहे. मालविका सूद ही काँग्रेस पक्षाची उमेदावर होती. मागच्या अनेक दिवसांपासून पंजाबमध्ये मालविका सूदच्या नावाची चर्चा होती. परंतु मालविकाचा पंजाबमध्ये निभाव लागू शकलेला नाही. पहिल्या स्थानावर आम आदमी पार्टी असून मालविका सूद ४४९० मतांनी तिसऱ्या स्थानावर आहे.

भाऊ सोनू सूद पाठिशी उभा असताना देखील मालविका सूदला पराभव पत्करावा लागला. मालविकाला सोनू सूदचा पाठिंबा मिळाला नाही का ? अशा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.

- Advertisement -

पंजाबमध्ये मालविकाच्या विरोधात भाजपचे आमदार हरज्योत होते. त्याचप्रमाणे आम आदमी पार्टीचे डॉ. अमनदीप कौर अरोडा आणि शिरोमणि अकाली दलाचे बरजिंदर सिंह माखन बरार यांचीही मालविकासोबत तगडी टक्कर पाहायला मिळाली.

कोरोना काळात अभिनेता सोनू सूद गरीबांच्या मदतीसाठी धावून आला होता. सोनूचे समाजकार्य पाहून सोनू यंदा निवडणूक लढवणार अशा चर्चा होत्या मात्र सोनू ऐवजी त्याची बहिण मालविका सूद निवडणूकीच्या रिंगणात उतरली.

- Advertisement -

बहिणीला निवडणूकीचे तिकीट मिळाल्यानंतर सोनू सूद म्हणाला होता, मला माझ्या बहिणीवर गर्व आहे. राजकारणाशी माझा तसा काहीही संबंध नाहीये असे म्हणत सोनूने बहिणीसाठी कोणतेही कॅम्पेन राबवण्यास नकार दिला होता. माझी बहिण स्वत:च्या मेहनतीवर आणि कामांवर यश मिळवेल. निडणूकांचे निकाल हाती आल्यानंतर सोनूच्या याच चूकीमुळे बहिण मालविकाचा पराभव झाल्याचे म्हटले जात आहे.


हेही वाचा – Punjab Election: कॉमेडियन ते पंजाब मुख्यमंत्री भगवंत मान यांचा प्रवास

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -