घरदेश-विदेशUttarakhand Joshimath Dam: मुख्यमंत्री घटनास्थळी रवाना; गंगा किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा

Uttarakhand Joshimath Dam: मुख्यमंत्री घटनास्थळी रवाना; गंगा किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा

Subscribe

मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या घटनेत अडकलेल्या लोकांसाठी 1070 आणि 9557444486  हेल्पलाईन नंबर जारी केले आहे.

उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यातील ऋषिगंगा नदीवरील राणी गावात असणाऱ्या २४ मेगावॅट जलविद्युत प्रकल्पातील बंधारा रविवारी सकाळी हिमस्खलनानंतर फुटला. पाण्याचा जोरदार प्रवाह धौलीगंगेकडे सरकल्याने दहा किलोमीटर अंतरावर तपोवन येथे धौलीगंगा नदीवर निर्माणाधीन ५२० मेगावॅट वीज प्रकल्पातील दुसरा बंधारासुद्धा फुटल्याचे वृत्त मिळतेय. रविवारी पहाटेपासून झालेल्या हिमस्खलनामुळे जलविद्युत प्रकल्पांचा बांध फुटला. पुराचा धोका लक्षात घेता तपोवन ते हरिद्वारपर्यंतचे सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गंगा आणि तिच्या उपनद्यांमधील रस्ते बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गंगेच्या काठावरील राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गंगेला पूर येण्याची शक्यता असल्याने गंगा किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री घटनास्थळी रवाना

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग हे घटनास्थळी रवाना झाले असून सातत्याने या घटनेवर नजर ठेवून आहेत. चमोली जिल्ह्यातील हिमस्खलनानंतर ऋषिगंगा आणि त्यानंतर धौलीगंगावरील जलविद्युत प्रकल्पातील धरण फुटल्याने गंगा आणि त्यावरील उपनद्यांना धोका निर्माण झाला आहे. राज्यातील चमोली ते हरिद्वारपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा मोठ्या प्रमाणात कामगार दोन्ही प्रकल्पांवर काम करत होते. कामगार वाहून गेल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी या घटनेबद्दल ट्विट देखील केले आहे.“चमोली जिल्ह्यातून आपत्तीची घटना घडली आहे.” या आपत्तीला सामोरे जाण्याचे आदेश जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांना देण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारच्या अफवांकडे दुर्लक्ष करा. सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहोत.

मुख्यमंत्र्यांकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या घटनेमध्ये अडकलेल्या लोकांसाठी 1070 आणि 9557444486  हेल्पलाईन नंबर जारी केले आहे.  रावत यांनी ट्वीटमध्ये लिहलं की “जर तुम्ही एखाद्या प्रभावित क्षेत्रामध्ये फकला असाल, आणि तुम्हाला कुठल्याही मदतीची गरज असेल तर कृपया या नंबरवर 1070 किंवा 9557444486 नंबरवर संपर्क करा. कृपया घटनेचा व्हिडिओ व्हायरल करू नका.

- Advertisement -

घटनास्थळी चार बचाव पथकं रवाना

डेहराडूनहून एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या चार पथकांना बचाव कार्यासाठी पाठविण्यात आले आहे. सतर्कतेचा इशारा पाहता परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. तर ऋषिकेश कोडियाला इको टूरिझम झोनमधील वॉटर पोलीस आणि एसडीआरएफ सतर्क झाले आहेत. पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन पथके राफ्टिंगच्या ठिकाणी पोहोचली आहेत. येथे राफ्टिंग थांबविण्यात आले आहे. यासह प्रशासनाने चमोली आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यातील नदीकाठच्या सर्व ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला असल्याचे सांगितले जात आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -