Viral Video: ‘लसूण म्हणजे आलं’, पाकिस्तानच्या मंत्र्याचे ज्ञान पाहून हसू आवरणे झालेय कठीण

Viral Video trends pakistan union minister fawad chaudhry dont know meaning of garlic omg
Viral Video: 'लसूण म्हणजे आलं', पाकिस्तानच्या मंत्र्याचे ज्ञान पाहून हसू आवरणे झालेय कठीण

पाकिस्तानच्या इम्रान खान यांच्या सरकारमधील माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी आपल्या बेताल वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. अशातच चौधरी यांच्या नव्या विधानावरून त्यांच्या ज्ञानाची झोळी देखील रिकामीच असल्याचे सिद्ध झालेय. फवाद चौधरी यांनी पाकिस्तानच्या महागाईच्या मुद्द्यावरून पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी आपल्या ज्ञानाचे असे काही प्रदर्शन केले जे ऐकून पाकिस्तानच्या नागरिकांना हसू आवरणेही कठीण झाले होते. या मंत्र्याने चक्क लसणाला ( Garlic) आलं (Ginjer) असल्याचे म्हणत, लसूण आणि आलं यात घेतलेला गोंधळ पत्रकार परिषद संपेपर्यंत सोडवत होते.

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांच्या अजब ज्ञानाचे दर्शन घडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. प्रसिद्ध पत्रकार नायला इनायत यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. फवाद चौधरी पत्रकार परिषदेत पाकिस्तानमधील महागाईच्या मुद्द्यावर बोलत आहेत. यावेळी बोलताना चौधरी म्हणाले की, “पाकिस्तानात महागाईचा दर कमी झालाय. ‘लसूण म्हणजे आलं’. म्हणजेच आलं… आल्यालाचं लसणू म्हणतात… नाही आलं म्हणतात. सॉरी गार्लिक इज अदरक… तर आल्याचे दर कमी झालेयत.” चौधरी यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितीत पोट भरून हसत होते. यावेळी अनेकांनी त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र हे मंत्री महोदय आपल्या मुद्द्यावर ठाम होते. लसूण म्हणजे फक्त आलं याचा ते पुनरुच्चार करत राहिले. त्यामुळे एकचं हशा पिकला. आत्ता सोशल मीडियावरही मंत्र्यांच्या या विधानावर जबरदस्त कमेंट केल्या जातायत. अनेकांनी उपहासात्मक पद्धतीने पुन्हा विचारले की, आलं याचा अर्थ लसूण ना, की आलं.

‘पाकिस्तानचे आइन्स्टाईन’

दरम्यान चौधरी यांच्या वक्तव्यानंतर आता सोशल मीडियावर मिम्स आणि कमेंट्सचा महापूर आलाय. एका युजर्सने लिहिले की, ‘हे तर पाकिस्तानचे आइन्स्टाईन आहेत.’ तर दुसऱ्या एका युजर्सने लसूणचा एक फोटो पोस्ट करत विचारले की, सांगा हे काय आहे? नाही तर क्लासबाहेर जाऊन उभे रहा. तर तिसऱ्या एका युजर्सने फवाद चौधरी यांच्या विधानाचा बचाव करत म्हटले की, लसूण आणि आले याबाबत हिंदी भाषेत चुका होतात. तर काही युजर्सनी कंगनाच्या ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ या चित्रपटातील एक संवाद शेअर केलाय.

दरम्यान काही दिवसांपूर्वी दहशतवादाच्या मुद्द्यावरून फवाद चौधरी यांनी पाकिस्तानच्या शाळा-महाविद्यालयांवर टीका केली होती. ‘पाकिस्तानात धर्मांधतेस मदरसे जबाबदार नाही तर १९८० ते १९९० च्या दशकात या हेतूने नियुक्त केलेल्या शाळा-महाविद्यालयाचे शिक्षक आहेत.’ असं ते म्हणाले होते. तसेच पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका कोणत्याही परकीय शक्तीपासून नाही तर स्वतःपासून आहे, असेही फवाद चौधरी म्हणाले होते. मात्र त्यांच्या आत्ताच्या विधानाने सर्वांनाच हसण्यासाठी एक नवं कारणं मिळालेय.