घरदेश-विदेशHathras Rape Case: 'नराधमांचे गुप्तांग कापा, २५ लाख बक्षीस मिळवा' VHS ची...

Hathras Rape Case: ‘नराधमांचे गुप्तांग कापा, २५ लाख बक्षीस मिळवा’ VHS ची ऑफर

Subscribe

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. दरम्यान, आता विश्व हिंदू सेनेचे प्रमुख अरुण पाठक यांनी हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींचं गुप्तांग कापणाऱ्यास २५ लाखांचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.

अरुण पाठक यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबतची घोषणा केली आहे. व्हिडीओमध्ये अरुण पाठक यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर टीका करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय, वाराणसी पोलिसांनी ज्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले आहेत ये योग्य नाहीत, असं म्हटलं आहे. या प्रकरणातील चारही आरोपीचं गुप्तांग कापेल, त्याला विश्व हिंदू सेनेकडून २५ लाख देण्यात येतील, अशी घोषणा करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणी भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय दोषींवरील कारवाईबाबत संकेत दिले आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडण्यात आलं असून लवकरच त्यांना जेलमध्ये टाकण्यात येईल. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. मला माहिती आहे की, त्यांच्या राज्यात कधीही गाडी पलटी होते. यावरुन उत्तर प्रदेशमधील गँगस्टर विकास दुबेच्या एनकाऊंटरची आठवण करुन दिली. हाथरस प्रकरणात देखील दोषींसोबत असंच घडू शकतं, असे संकेत विजयवर्गिय यांनी दिले.


हेही वाचा – Hathras gang rape: ‘योगींच्या प्रदेशात कधीही गाडी उलटते’; भाजप नेत्याने दिले संकेत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -