घरदेश-विदेशदैव बलवत्तर, मोबाईल आणि बोगद्यातील छिद्रामुळे मजुरांचा वाचला जीव पाहा VIDEO

दैव बलवत्तर, मोबाईल आणि बोगद्यातील छिद्रामुळे मजुरांचा वाचला जीव पाहा VIDEO

Subscribe

बोगद्यात अडकल्याने असे वाटले की आता आपले इथून बाहेर निघणे शक्य नाही.

उत्तराखंडमध्ये रविवारी हिमकडा कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ही घटना घडली असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. सकाळी पुन्हा बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. आयटीबीपी जवानांनी रात्रीही युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु ठेवले होते. हिमकडा कोसळल्याने अनेक वस्त्या या हिमकड्याच्या तडाक्यात घावल्या आहेत. तसेच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक हिमकडा कोसळल्याने मजूर आणि नागरिकांनी धावपळ केली. यावेळी तपोवन येथील एका बोगद्यात काही मजूर काम करत होते. या मजूरांना काही कळण्याआधीच त्या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. या मजूरांना सुखरुप बाहेर काढण्यात जवानांना यश आले आहे.

हिमकडा दुर्घटनेत बोगद्यात अडकलेल्या त्या १६ मजूरांना वाचवल्यानंतर त्यातील एका मजूराने बोगद्यातील थरारक घटना सांगितली. हिमकडा कोसळला आणि बाहेर हाहाकार माजला होता. यावेळी आम्ही बोगद्यात ३०० मीटर आत काम करत होतो. आम्हाला बाहेर येण्यासाठी आमच्या नावाने लोकं ओरडत होते. आम्हाला काही कळायच्या आतच बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी घुसायला सुरुवात झाली. आम्ही जीव वाचवण्यासाठी बोगद्यात वरती असलेल्या लोखंडी सळईला पकडून ठेवले होते. संपूर्ण बोगद्यात पाणी शिरले होते. आम्ही श्वास घेण्यासाठी डोक पाण्याबाहेर काडले होते. जवळ जवळ अनेक तासांनंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. त्यावेळी आम्ही बाहेर निघण्याचा मार्ग शोधू लागलो परंतु चिखल झाल्याने बोगद्याचे प्रवेशद्वार बंद झाले होते.

- Advertisement -

मजुराने पुढे सांगितले, आम्ही बोगद्यातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधत असताना आम्हाला बोगद्याला एक छिद्र दिसले. हिमकडा कोसळताना तडा गेल्याने बोगद्याला छिद्र तयार झाले होते. आम्ही त्या छिद्राजवळ येऊन मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न केला. एका मजूराकडे मोबाईल होता. मोबाईलला नेटवर्क असल्यामुळे मजुराने एनटीपीसीच्या सुपरवायजरला फोन केला. त्यांनी काही वेळाने आयटीबीपी जवान आम्हाला वाचवण्यासाठी तेथे पोहोचले. बोगद्यासमोरील साचलेला चिखल बाजूला करत जवानांनी मजूरांना सुखरुप बाहेर काढले. या जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- Advertisement -

बोगद्यात अडकल्याने असे वाटले की आता आपले इथून बाहेर निघणे शक्य नाही. असे एका मजूराने म्हटले आहे. मृत्यूचा थरारक प्रकार पाहिल्याचे या मजुराने सांगितले.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -