घरदेश-विदेशसुप्रीम कोर्ट चुकतंय हे पोलिसांनी सांगण्याची गरज नाही; महाराष्ट्र पोलिसांना झापले

सुप्रीम कोर्ट चुकतंय हे पोलिसांनी सांगण्याची गरज नाही; महाराष्ट्र पोलिसांना झापले

Subscribe

सुप्रीम कोर्टाने पाचही आरोपींबद्दल दया बाळगू नये, असा सल्ला महाराष्ट्र पोलिसांनी दिला होता. आज कोर्टाने याबद्दल राज्य सरकार आणि पोलिसांचे कान उपटले.

पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाचही आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यासाठी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात आली. यावेळी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना चांगलेच झापले. “राज्य सरकारने पोलीस प्रशासनाला जरा गांभीर्याने वागण्यास सांगितले पाहीजे. सुप्रीम कोर्ट कसे चुकीचे आहे, हे आम्हाला पोलिसांकडून ऐकण्याची आवश्यकता नाही.”, अशी तंबीच सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारकडून कामकाज पाहणारे वकिल तुषार मेहता यांना दिली. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. या खंडपीठामध्ये न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश होता.

एल्गार परिषदेच्यानंतर भीमा कोरेगाव येथे उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी ज्या पाच सामाजिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती त्यांना घरीच नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता. आज पुन्हा सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली तेव्हा कोर्टाने त्यांच्या नजरकैदेत वाढ करुन १२ सप्टेंबरपर्यंत करण्याचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाचे सन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला असून. पुणे पोलिसांनी दिलेल्या सबबीवर कोर्टाने असंतोष व्यक्त करत पोलीस कोर्टावर दडपण आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. न्यायाधीशांनी पोलिसांच्या भूमिकेवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की,

- Advertisement -

तसेच, याचिकाकर्ता रोमिला थापर आणि इतरांना फौजदारी खटल्यात तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप करु नये असेही सांगितले. दरम्यान तुषार मेहता यांनी तपासात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पाचही कार्यकर्त्यांना घरीच नजर कैदेत ठेवण्याची मागणी पुन्हा लावून धरली. त्यामुळे कोर्टाने याबद्दलची सुनावणी १२ सप्टेंबर रोजी घेण्याचे ठरवले आहे.

- Advertisement -

काल महाराष्ट्र पोलिसांनी या पाचही आरोपींना दया दाखवू नये, अशी विनंती केली होती. “टक केलेल्या कार्यकर्ते बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळेच आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करत आहोत. त्यांच्या सरकार विरोधी विचारांबद्दल आमचे काहीच म्हणणे नाही.”

Activist Arrest: समाजाला अस्थिर करण्याचा डाव होता – पोलिसांचा दावा

पुणे पोलिसांनी पाचही मानवधिकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर देशभरातून विविध घटक याचा निषेध करत आहेत. पुणे पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी देशभरात धाड टाकून तेलगू कवी वरवरा राव यांना हैदराबाद येथून, वर्नन गोन्सालविस आणि अरुण फरेरा यांना मुंबईतून, वकिल सुधा भारद्वाज यांना फरिदाबाद आणि गौतम नवलखा यांना दिल्ली येथून अटक केली होती. पाचही कार्यकर्ते भीमा कोरेगाव हिंसाचारासाठी जबाबदार असून ते नरेंद्र मोदी यांची हत्या घडवून आणण्याचे नियोजन करत होते, अशी माहिती पोलिसांनी एफआयआरमध्ये दिली होती.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही पोलिसांच्या अटकसत्रावर नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणाची सू मोटो दखल घेत पोलिसांनी अटक प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -