घरदेश-विदेशWeather Update : देशभरात यंदा १४ दिवस आधीच मान्सूनचा वेग वाढला -...

Weather Update : देशभरात यंदा १४ दिवस आधीच मान्सूनचा वेग वाढला – IMD

Subscribe

देशातील विविध राज्यांमध्ये आता मान्सून दाखल झाला आहे. परंतु यंदा मान्सूनने उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील काही भाग वळगता देशभरातील बहुतांश भाग १० दिवसांच्या आताच व्यापून टाकला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार राज्यांमधी काही ठिकाणी मान्सूनचे वेळेआधीच आगमन झाले आहे. तर पश्चिमेतील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमालचल प्रदेश, लड्डाख, गिलगित बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद आणि उत्तर हरियाणा, चंदीगड, उत्तर पंजाबमधील काही भागांतही रविवारी पावसाने जोरदार धड़क दिली.

यापूर्वी १३ जून २०१३ मध्ये मान्सूनन जोरदार एंट्री संपूर्ण देश व्यापला होता.अशी माहिती आयएमडी पुणेतील हवामान तज्ज्ञ ओ.पी. श्रीजीत यांनी दिली आहे. उत्तरेकडील मान्सूनची सीमा (एनएलएम) दीव, सूरत, नंदुरबार, भोपाळ, नॉवोंग, हमीरपूर, बाराबंकी, बरेली, सहारनपूर, अंबाला आणि अमृतसर येथून जात आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत नैऋत्य मॉन्सूनला पूर्वप्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबचा उर्वरित भागांमध्ये सुरुवात होणार असून अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यंदा १ जूनपासून देशभरात २५ टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर ४६ उपविभागांपैकी १२ भागांत ‘मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी’ (सामान्यपेक्षा ६० टक्के), १० ठिकाणी ‘जादा’ पाऊस (२०% ते ५९%) आणि नऊ ठिकाणी (-१९ ते १९ टक्के) सामान्य पाऊस नोंदवला गेला आहे.

- Advertisement -

गेल्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनपूर्व पाऊसाला पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागात सुरुवात झाली आहे. तर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. उत्तर प्रदेशच्या काही भागात १० ते १२ सें.मी. पावसाची नोंद झाली. केवळ राज्यांमध्ये जोरदार वारे वाहू लागल्यामुळे आयएमडीने पश्चिम भारतातील बर्‍याच भागात पावसाला सुरवात होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा मान्सून वेळेआधीच देशात दाखल झाला आहे. अरबी समुद्रात पश्चिम आणि दक्षिण पश्चिम हवेचा वेग वाढल्याने आणि बंगालच्या खाडीत कमी दबाव क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सूनला अनुकूल वातावरण मिळत आहे.

यंदा मान्सूनचा अंदाज मागील वर्षीच्या म्हणजेच १९६१ ते २०१९ आकडेवारीच्या आधारे आणि १९७१ ते २०२१ मान्सून माघार घेण्याच्या आकडेवारीनुसार जाहीर करण्यात आला आहे तर २०२१ पर्यंत सुरुवात व माघारीची तारीख निश्चित केली गेली. जुन्या मान्सूनच्या प्रगतीची तारीख पाहता मान्सून संपूर्ण देशाला केवळ १५ जुलैपर्यंत व्यापून टाकू शकेल.

- Advertisement -

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -