घरCORONA UPDATEVaccination: १२ वर्षांवरील ८० टक्के लहान मुलांच्या लसीकरणाचा केंद्राचा प्लॅन, भारत बायोटेकसोबत...

Vaccination: १२ वर्षांवरील ८० टक्के लहान मुलांच्या लसीकरणाचा केंद्राचा प्लॅन, भारत बायोटेकसोबत चर्चा

Subscribe

मुलांच्या ८० टक्के लसीकरण्यासाठी दोन डोस असलेल्या कमीत कमी २ करोड १० लाख लसींच्या डोसची आवश्यकता

देशात लहान मुलांच्या लसीकरणासाठी लसींची ट्रायल सुरु करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी होत असताना देशातील लसीकरण मोहिमेत वाढ करण्यात आली आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने योजना तयार केल्या आहेत. लवकरच देशातील १२ वर्षांवरील ८० टक्के लहान मुलांच्या लसीकरणाचा केंद्राचा प्लॅन आहे. यासाठी केंद्र सरकार भारत बायोटेकसोबत चर्चा करत आहे. त्यामुळे लवकरच १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. देशातील १२ ते १८ वयोगटातील १ करोड ३० लाख लहान मुलांच्या ८० टक्के लसीकरण्यासाठी दोन डोस असलेल्या कमीत कमी २ करोड १० लाख लसींच्या डोसची आवश्यकता आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, १२ ते १५ वयोगटातील मुलांसाठी यूरोपीय संघाने फायझरची mRNA लसीच्या टेस्टिंगला परवानगी दिली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, भारतात लहान मुलांसाठी लस तयार करण्यासाठी भारत स्वदेशी क्षमतेचा उपयोग करु शकतो. भारत बायोटेकही भारतात लहान मुलांच्या लसीकरणासाठी लसीची ट्रायल सुरु केली आहे.

- Advertisement -

भारत बायोटेक मोठ्या ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. कंपनीला २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लस आणि कोव्हॅक्सिनच्या ट्रायलसाठी मंजूरी मिळाली आहे. लसीची चाचणी यशस्वी झाली तर अधिक लोकांना लसीकरण करता येईल,असे भारत बायोटेकने म्हटले आहे.   अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सध्या फायझर कंपनीसोबत बातचित करत आहेत. लसी जेव्हा उपलब्ध होतील तेव्हा त्यानुसार त्याची प्राथमिकता ठरवता येईल त्याचप्रमाणे १२ ते १८ वयोगटातील लहान मुलांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे अशावेळेस जर कोव्हॅक्सिन उपलब्ध झाली तर चांगले होईल,असे त्यांनी म्हटले आहे.


हेही वाचा –  Coronavirus India Update: दिलासादायक! देशात ९ लाखांहून अधिक रुग्ण सक्रिय; ७२ दिवसांत नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक घट

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -