घरदेश-विदेश'पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात'

‘पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात’

Subscribe

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी लागला. यामध्ये ममता बॅनर्जी यंच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं आहे. तृणमूलला २१३ तर भाजपला ७७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. ममतादीदींनी भाजपला एकहाती धूळ चारल्याची चर्चा असताना भाजपचे नेते कैलास विजयवर्गिय यांनी मोठं विधान केलं.

कैलास विजयवर्गिय यांचं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात होता असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी कैलास विजयवर्गिय यांच्या विधानाचा हवाला देत केला आहे. “पश्चिम बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांचा गौप्यस्फोट..! शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय.” याचा अर्थ शरद पवारांचा अदृश्य हात पश्चिम बंगालच्या निवडणुकीत होता..!” असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

- Advertisement -

बंगालमध्ये ‘गड आला पण सिंह गेला’

देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा १९५३ मतांनी पराभव झाला आहे. याआधी ममता बॅनर्जी यांचा १२०० मतांनी विजय मिळवला असल्याबाबत एएनआयनं माहिती दिली होती. त्यामुळं ममता यांचा विजय झाला असल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा १९५३ मतांनी पराभव झाला आहे. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -