घरदेश-विदेशधक्कादायक! बंगाल निवडणूकीदरम्यान काँग्रेसच्या उमेदवाराचं कोरोनानं निधन

धक्कादायक! बंगाल निवडणूकीदरम्यान काँग्रेसच्या उमेदवाराचं कोरोनानं निधन

Subscribe

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस देशात बाधितांचा आकडा १ कोटी ४० लाख ७४ हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे कोरोनाची सद्यस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असताना निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. पश्चिम बंगालमधील राजकीय पक्ष तृणमूल काँग्रेस (TMC), भारतीय जनता पक्ष (BJP), काँग्रेस (Congress) आणि इतर डावे पक्ष जोरदार प्रचार करताना दिसताय. मात्र हा प्रचार करतांना सर्व पक्षांनाच कोरोनाचा विसर पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगाल निवडणूकीदरम्यान काँग्रेसच्या एका उमेदवाराचे कोरोनाने निधन झाले आहे. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मुर्शिदाबादमधील समसेरगंज मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार रिजाउल हक (Rezaul haque) यांचे गुरुवारी कोरोनाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मुर्शिदाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बंगाल प्रदेश कॉंग्रेसचे सचिव रोहन मित्रा यांनी रिजाउल हक यांच्या निधनाची बातमी ट्वीट करून दिली. “मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समसेरगंज मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार रिजाउल हक यांचं कोरोनामुळे निधन झाले आहे,” असे त्यांनी ट्वीट केले आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीचा रणसंग्राम सुरू असताना कॉंग्रेसचे उमेदवार रिजाउल हक यांचं निधन हे धक्कादायक आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान कोरोना फैलाव वेगाने होण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या २४ तासात पश्चिम बंगालमध्ये ५ हजार ८९२ नव्या रुग्णांची नव्याने नोंद करण्यात आली. तर २४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.


कोरोना दीर्घकाळ भूतलावर वास्तव्य करणार; WHO च्या अध्यक्षांचं वक्तव्य

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -