घरमहाराष्ट्रनितीन गडकरी बेळगावमध्ये मराठी माणसाला पाडण्यासाठी प्रचार करणार का?; राऊतांचा सवाल

नितीन गडकरी बेळगावमध्ये मराठी माणसाला पाडण्यासाठी प्रचार करणार का?; राऊतांचा सवाल

Subscribe

बेळगाव लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. यासाठी शिवसेनेचे खासादार आणि प्रवक्ते संजय राऊत हे प्रचारात उतरले आहेत. संजय राऊत यांनी बुधवारी बेळगावमध्ये प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नितीन गडकरी यांना सवाल केला आहे. नितीन गडकरी तुम्ही बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपच्यावतीने सभा घेणार आहात का? असा सवाल राऊतांनी केला आहे. यावेळी त्यांनी नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. ते केवळ विदर्भाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी बेळगावातील लोकसभा पोटनिवडणुकीत मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करु नये, असं आवाहन देखील संजय राऊत यांनी केलं.

बेळगाव पोटनिवडणुकीची लढत भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती अशी तिरंगी झाली आहे. भाजपने इथे ताकद लावली वा काँग्रेसने इथे ताकद लावली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ते राष्ट्रीय पक्ष आहेत. पण महाराष्ट्रातील नेत्यांनी मग कोणत्याही पक्षाचे असोत, इथे येऊन मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची बेईमानी करू नये, असं संजय राऊत म्हणाले. काँग्रेसचे असतील किंवा भाजपचे तसंच राष्ट्रवादी किंवा शिवसेना इथे मराठी माणसाच्या विरोधात प्रचार करणे शक्यच नाही. काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते इथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करतील असं मला वाटत नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी, तर काँग्रेसतर्फे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -