घरताज्या घडामोडीनव्या Norovirusची काय आहेत लक्षणे आणि उपचार? जाणून घ्या

नव्या Norovirusची काय आहेत लक्षणे आणि उपचार? जाणून घ्या

Subscribe

गेल्या पावणे दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी सामना करत आहे. पण सध्या अनेक देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र आता यादरम्यान नवा व्हायरसचे संकट आले आहे. या व्हायरसचे नाव नोरोव्हायरस असे आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यात नोरो व्हायरसचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे केरळ सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. या नव्या नोरोव्हायरसबाबत आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

हा नवा व्हायरस लागण झालेल्या व्यक्तीला उलट्या आणि अतिसारची समस्या असते. परंतु हा व्यक्ती काही दिवसांत बरा होतो. हिवाळ्यात या व्हायरसमुळे लागण झालेली प्रकरणे अधिक दिसून येतात. हा व्हायरस प्राण्यांपासून माणसात पसरतो.

- Advertisement -

…असा पसरतो हा व्हायरस

दूषित पाणी, दूषित अन्न आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे नोरो व्हायरस पसरतो. त्यामुळे केरळ सरकारने पाण्याच्या शुद्धीकरणासाठी त्यात अधिक क्लोरीन मिसळले आहे. या व्हायरसचे संसर्ग जीवघेणे नसते. परंतु लहान मुले आणि वृद्धांनी या व्हायरसपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. संक्रमण झाल्याने उलट्या आणि अतिसार होण्याची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

नोरोव्हायरसवर काय आहे उपचार?

या व्हायरसचे संसर्ग झालेल्या रुग्णाला काही खास किंमतीचे औषध दिले जात नाही. केरळच्या आरोग्य मंत्रालयाने या उपचारासाठी प्रोट्रोकॉल जारी केला आहे. त्यानुसार नोरोव्हायरस संक्रमित व्यक्तीने घरात आराम केला पाहिजे. ओआरएस आणि उकळलेल पाणी प्यायला पाहिजे. तसेच जेवणापूर्वी आणि शौचालयाला गेल्यानंतर साबणाने व्यवस्थितीत हात धुतले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे प्राण्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी खासकरून सतर्क राहिले पाहिजे.

- Advertisement -

सर्वात पहिल्यांदा कुठे आढळला हा व्हायरस?

नोरोव्हायरस हा एक छोटासा व्हायरस आहे. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर या व्हायरसची लागण होते. अमेरिकेत पहिल्यांदा हा व्हायरस आढळला. अमेरिकेत नोरोव्हायरसची प्रकरणे अधिक आहेत. परंतु हा जीवघेणा व्हायरस असल्याचे मानले जात नाही. या व्हायरसचा प्रसार जास्त करून रेस्टॉरंट इत्यादीतून होतो.


हेही वाचा – दिवाळी संपताच कोरोनाचे टेन्शन वाढले, २४ तासात ५०० जणांचा मृत्यू


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -