घरदेश-विदेशपंतप्रधान झाल्यावर काय करणार? राहुल गांधींनी सांगितलं व्हिजन

पंतप्रधान झाल्यावर काय करणार? राहुल गांधींनी सांगितलं व्हिजन

Subscribe

Rahul Gandhi | पंतप्रधान बनल्यानंतर राहुल गांधी काय करणार असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारताच त्यांनी योग्य आणि सूचक उत्तर दिलं आहे.

नवी दिल्ली – काँग्रेस नेता राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) बरेच व्यस्त आहेत. जनसभा आणि माध्यमासंमोर येत ते सातत्याने जनसंपर्क वाढवत आहेत. दरम्यान, राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे दावेदार असल्याचा उल्लेख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी केला होता. त्यामुळे पंतप्रधान बनल्यानंतर राहुल गांधी काय करणार असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारताच त्यांनी योग्य आणि सूचक उत्तर दिलं आहे.

राहुल गांधी म्हणाले, सर्वांत आधी मी देशातील शिक्षणासंदर्भात धोरण आखणार. आपली शिक्षण व्यवस्था योग्यप्रकारे काम करत नाही. या शिक्षणामुळे मुलांना कसलंच व्हिजन मिळत नाही. भारत जोडो यात्रेत मी हजारो मुलांशी संवाद साधला. कॉलेज संपल्यानंतर तुम्ही काय करणार असा प्रश्न मी अनेकांना विचारला. डॉक्टर, वकील, अभियांत्रिक, पायलट आणि आयएएस एवढीच पाच उत्तरे मला मिळाली. जवळपास ९९.९ टक्के विद्यार्थ्यांनी हीच उत्तरे दिलं. म्हणजेच, या पाच कामांव्यतिरिक्त आपल्याकडे इतर कामंच उपलब्ध नसल्याचा समज आपल्या शिक्षण व्यवस्थेने निर्माण केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा २०२४मध्ये राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचं मोठं वक्तव्य

कौशल्याचा मान ठेवल्याशिवाय तरुणांना रोजगार देता येणार नाही. ज्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांची कदर केली जात नाही. त्यांचं कौशल्य संपवण्याच्या मागे आपण आहोत. त्यामुळे कौशल्य विकासावर भर दिला गेला पाहिजे.

- Advertisement -

राहुल गांधी पुढे म्हणाले, देशातील बंधुभाव, एकता आणि प्रेमाचा प्रसार केला पाहिजे. याचा परिणाम देशाच्या सीमांवरही पडतो. देशातील हिंसा, द्वेषाचा परिणाम इतर देश पाहतात. त्यामुळे शेजारील देश त्याचा फायदा घेतात. आपली विेदशी नीती प्रचंड भ्रमित करणारी आहे. त्यामुळे आपल्याला जबरदस्त नुकसान होत आहे. कोरोनाकाळातही मी हेच बोलत होतो.

राहुल गांधी यांनी हे तीन व्हिजन सांगितले आहेत. पंतप्रधान झाल्यावर हे तीन उद्दीष्ट ते सर्वार्थाने करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – राहुल गांधींकडूनच मार्गदर्शक तत्त्वांचे अनेकदा उल्लंघन, काँग्रेसच्या तक्रारीवर सीआरपीएफचे उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -