घरताज्या घडामोडी२०२२ वर्षाचा अखेरचा दिवस ठरतोय 'अपघात'वार; इतक्या जणांचा मृत्यू तर 68 जण जखमी

२०२२ वर्षाचा अखेरचा दिवस ठरतोय ‘अपघात’वार; इतक्या जणांचा मृत्यू तर 68 जण जखमी

Subscribe

आज वर्षाचा अखेरचा दिवस म्हणजेच थर्टी फस्ट (Thirty First) असून सर्वत्र नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी केली जात आहे. मात्र एकिकडे आनंदमयी वातावरण आहे, तर दुसरीकडे याच आनंदाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळते आहे. कारण वर्षाचा शेवटचा दिवस हा अपघाती ठरत आहे.

आज वर्षाचा अखेरचा दिवस म्हणजेच थर्टी फस्ट (Thirty First) असून सर्वत्र नववर्षाच्या स्वागतासाठी तयारी केली जात आहे. मात्र एकिकडे आनंदमयी वातावरण आहे, तर दुसरीकडे याच आनंदाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळते आहे. कारण वर्षाचा शेवटचा दिवस हा अपघाती ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विविध अपघातात 16 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 68 जण जखमी झाले आहेत. (Thirty First five accidents on the last day of 2022 year and 16 people died 68 injured)

औरंगाबाद आणि शिर्डी येथे सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा बारामतीमध्ये अपघात झाला. बारामतीच्या सांगवी रस्त्यावर सहलीच्या बसला अपघात झाला. या अपघातात 24 मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

कोल्हापुरातील इचकरंजीतील सागर क्लासेसची आठवी ते दहावीच्या मुलींची सहल औरंगाबाद आणि शिर्डी येथे गेली होती. मात्र शिर्डी येथून इचलकरंजी येथे परतत असताना यशोदा ट्रॅव्हल्सच्या बसला बारामतीमधील पाहुणेवाडी गावच्या हद्दीत अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या अपघातात 24 मुली किरकोळ तर 3 मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. सध्या जखमींवर बारामतीतील महिला रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुजरातच्या नवसारीमध्ये बस आणि कारचा भीषण अपघात झाला. बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने गुजरातच्या वेस्मा गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला. तसेच, 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस अहमदाबादहून मुंबईला जात होती. या अपघातानंतर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बस बाजूला केली.

- Advertisement -

नंदुरबारच्या खोकसा घाटात पिकअप गाडी उलटल्याने दोन मजूरांचा मृत्यू झाला. तसेच, 11 जण जखमी झाले आहेत. हे मजूर धुळे जिल्ह्यातील उमरपाटा गावाला जात होते. कामावरून परतत असताना हा अपघात झाला. मजुरांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुणे बंगळुरु महामार्गावर वारजे पुलावर झालेल्या अपघातात बाईकस्वाराचा मृत्यू झाला. वारजे नदी पुलावरून धायरीकडे जात असताना यवतमाळ एकाला ट्रकने जोरदार धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली आल्यानं संकल्पचा जागीच मृत्यू झाला.

नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी मुंबईच्या भांडुप येथून बाईकवरून निघालेल्या दांम्पत्याचा मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरने धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या अपघातात सहा वर्षाची चिमुकली बचावली आहे. या घटनेनंतर कंटेनर चालक कपिल राजाराम देव याला ताब्यात घेण्यात आले आहे.


हेही वाचा – ऋषभ पंतसाठी देवदूत ठरलेल्या ‘त्या’ दोघांचा प्रजासत्ताकदिनी होणार सत्कार; सरकारची घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -