घरदेश-विदेशहोऊ दे खर्च... गाडीच्या नंबर प्लेटसाठी मोजले 15 दशलक्ष डॉलर, गिनिज बुकमध्ये...

होऊ दे खर्च… गाडीच्या नंबर प्लेटसाठी मोजले 15 दशलक्ष डॉलर, गिनिज बुकमध्ये नोंद

Subscribe

दुबई : हौसेला काही मोल नसते, अशा घटना आपण वरचेवर बघत असतो. विशेषत: गाडीसाठी व्हीआयपी नंबर घेण्यासाठी अनेक धनाढ्य जादाचे पैसे भरण्यासही तयार असतात. पण दुबईमध्येही अशाच एका शौकीन व्यक्तीने आपल्या गाडीच्या नंबर प्लेटसाठी तब्बल 15 दशलक्ष डॉलर्सची (123 कोटी रुपये) बोली लावली. यासाठी या व्यक्तीची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे.

आपल्या कारचा नंबर युनिक असावा असे प्रत्येकाला वाटते. महाराष्ट्रात तर, ‘दादा’, ‘साई’, ‘नाना’ अशी गाडी नंबरची किमया पाहायला मिळते. त्यासाठी जास्तीचे पैसे मोजले जातात. पण दुबईतील एका व्यक्तीने त्याच्या कारच्या नंबर प्लेटसाठी 15 दशलक्ष डॉलर्सची बोली लावली. हा क्रमांक P7 आहे. कारच्या क्रमांकासाठी ही बोली जगात सर्वाधिक आहे. बोली लावणाऱ्याची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. प्लेट नंबर P7 ही पहिल्यांदा फक्त 7 नंबरच असावा, अशी दिसते. एमिरेट्स ऑक्शन एलएलसीने हा लिलाव आयोजित केला होता.

- Advertisement -

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही रक्कम दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद यांच्या ग्लोबल फूड एड उपक्रमासाठी देण्यात येईल. या नव्या विक्रमी लिलावामुळे 2008 मध्ये स्थानिक व्यापारी सईद अब्दुल गफ्फार खौरी यांचा विक्रम मोडला गेला. त्यांनी अबू धाबीमधील नंबर एक प्लेटसाठी 52.2 दशलक्ष दिऱ्हम दिले होते. संयुक्त अरब अमिरातीमध्ये महागड्या नंबर प्लेटचा लिलाव नियमितपणे केला जातो. दुबईसह इतर अमिरातींचे अमीर, त्यांचे वैभव आणि संपत्ती दर्शविण्यासाठी चॅरिटी करतात, असे सांगितले जाते.

- Advertisement -

संयुक्त अरब अमिरातीमध्ये नोंदणी केलेली नंबर प्लेट कोणत्याही कारसाठी वापरता येऊ शकते; मग ती सुपरकार असो किंवा नसो. विशेष म्हणजे, अशा नंबर प्लेट्स इतर देशांमध्येही जादा पैसे देऊन विकत घेतल्या जातात. या वर्षाच्या सुरुवातीला, हाँगकाँगमध्ये एका व्यक्तीने लिलावात R अक्षर असलेल्या प्लेटसाठी 32 लाख डॉलर मोजले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -