घरदेश-विदेशव्हॉटसअॅपने अखेर भारतासाठी नेमला तक्रार अधिकारी

व्हॉटसअॅपने अखेर भारतासाठी नेमला तक्रार अधिकारी

Subscribe

व्हॉटसअॅप हे सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे.  २० कोटी युजर्स आहेत. झटपट मेसेज आणि मीडिया शेअरींग साठी  हे अॅप प्रसिद्ध आहे

व्हॉटसअॅपच्या फेक व्हायरल मेसेजने आतापर्यंत अनेक गोंधळ झाले आहेत. मुल पळविण्याची टोळी या फेक मेसेजमुळे अनेक ठिकाणी मॉब लिंचिंगचा प्रकार घडला. यात कित्येक जणांना प्राण गमवावा लागला. हे प्रकार टाळण्यासाठी व्हॉटसअॅपने अनेक बदल देखील केले. पण व्हॉटसअॅपने एक तक्रार अधिकारी नेमावा अशी मागणी भारताकडून माहिती प्रसार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी यांनी केली होती. अखेर व्हॉटसअॅपने भारतासाठी तक्रार अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.

कोणाची लागली वर्णी ?

तक्रार अधिकारी या पदासाठी कोमल लहीरीची वर्णी लागली आहे. ज्या व्हॉटसअॅपच्या वरिष्ठ संचालक आहेत. ज्या युएसमध्ये असतात. त्यांची या पदावर ऑगस्टच्या शेवटाला या पदावर नेमणूक करण्यात आली. लहीरी यांना लिंक्ड इनवर तक्रार करता येणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या अॅपमधून तसेच मेलच्या माध्यमातून देखील तक्रार नोंदवू शकणार आहात.

- Advertisement -

व्हॉटसअॅपचे सर्वाधिक युजर्स

व्हॉटसअॅप हे सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे.  २० कोटी युजर्स आहेत. झटपट मेसेज आणि मीडिया शेअरींग साठी  हे अॅप प्रसिद्ध आहे. त्यामुळेच याची सुरक्षा अधिक महत्वाची असल्याचे रवी शंकर प्रसाद यांनी  म्हटले होते म्हणूनच त्यांनी व्हॉटसअॅप प्रमुखांकडे केली होती.

अधिक माहितीसाठी वाचा- व्हॉटसअॅपला भारतीय नियमांचे पालन करावेच लागणार- प्रसाद

व्हॉटसअॅपने केले बदल

मॉब लिंचिंगनंतर व्हॉटसअॅपने अनेक बदल केले. ग्रुपमध्ये पाठलेला मेसेज जर फॉरवर्डेड असेल तर आता मेसेजवर ते लिहून येते. शिवाय आता एका वेळी फक्त ५ जणांना एखादा मेसेज पाठवता येतो. या मागे मेसेज एकाचवेळी अनेकांना पसरु नये असा हेतू होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -