घरमनोरंजन'अशी ही बनवाबनवी' ची ३० वर्ष

‘अशी ही बनवाबनवी’ ची ३० वर्ष

Subscribe

मराठीतील माईलस्टोन ठरलेला अजरामर चित्रपट अशी ही बनवाबनवी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने चित्रपटांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

मराठीतील अजरामर कलाकृती म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’ हा विनोदी चित्रपट. सचिन पिळगावकर दिग्दर्शीत आणि अभिनत या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी होती. आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाला ३० वर्ष पूर्ण झाली आहे. २३ सप्टेंबर १९८८ साली हा सिनेमा प्रदर्शीत झाला होता. या सिनेमाने अवघ्या राज्यात हास्याने धुमाकूळ घातला होता. मराठीतील लोकप्रीय जोडगोळी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या परफेक्ट टाईमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले. सोबतीला सुशांत रे, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे, अश्विनी भावे आणि सुधीर जोशी यांच्या सशक्त अभिनयाची जोड होती.

ashi hi banava banavi
चित्रपटातील लक्ष्मीकांत आणि सचिनचे स्त्री वेशातील अवतार

पार्वती – सुधाच्या भूमिकेतील लक्ष्या आणि सचिन

सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक प्रयोग केले. दोन पुरुष कलाकारांना महिलेच्या रुपात प्रेक्षकांसमोर सादर केले. प्रेक्षकांनीही त्यांना स्विकारले. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारलेली पार्वती आणि सचिनने साकारलेली सुधा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सचिन तर महिलेच्या वेशात खुपच शोभून दिसला होता. यातील ‘हृदयी वसंत फुलताना’, ‘ही दुनिया मायाजाल’, ‘अशी ही बनावाबनवी’ आणि ‘कुणी तरी येणार येणार गं’ ही गाणी देखील तुफान गाजली होती.

- Advertisement -
ashi hi banava banavi
अशी ही बनवाबनवी ची संपूर्ण टीम

चित्रपटातील संवादासाठी लोकप्रीय ठरला 

प्रामुख्याने या चित्रपटातील डायलॉग खुपच लोकप्रीय झाले होते. सुधीर जोशी आणि अशोक सराफ यांच्यातील संवाद, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पार्वतीच्या रुपातील वाक्य, सुधा आणि सुधीरची सरमिसळ, मालकीणबाई कोळभोर यांच्याशी केलेली बनवीबनवी हे सगळचं मजेशीर होतं. ते आजही प्रेक्षकांना हसवण्यास कारणीभूत ठरत आहे. चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाली असली तरीही आताच्या पीढीला देखील हा निखळ मनोरंजन देतो. यापुढेही अशी ही बनवाबनवी चित्रपटाची जादू कायम राहील यात शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -