घरदेश-विदेशऑनलाइन ल्युडो खेळता-खेळता 'मुलायसिंह यादव' पडला पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमात आणि...

ऑनलाइन ल्युडो खेळता-खेळता ‘मुलायसिंह यादव’ पडला पाकिस्तानी तरुणीच्या प्रेमात आणि…

Subscribe

बंगळुरू : ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ करण्याची तयारी प्रियकराची असते. पण कधी कधी हे ‘वाट्टेल ते करणे’ थेट तुरुंगाच्या वाटेवर घेऊन जाणारे ठरते. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. एका पाकिस्तानी मुलीला बनावट ओळख देऊन भारतात आणल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी सोमवारी एका तरुणाला अटक केली. या तरुणाचे नाव मुलायमसिंह यादव (२५) असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या मुलायमने 19 वर्षीय इक्रा जीवानीला नेपाळमार्गे भारतात आणले. पोलिसांनी मुलीला शासकीय महिलागृहात पाठवले आहे.

काही महिन्यांपूर्वी गेमिंग अॅपवर ल्युडो खेळताना एका पाकिस्तानी तरुणी इक्राची उत्तर प्रदेशातील तरुण मुलायमसिंहशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्याने तिला नेपाळमध्ये बोलावले. तिथेच दोघांनी लग्न केले. बिहारमधील बीरगंज येथे जाण्यासाठी हे जोडपे भारतीय हद्दीत घुसले आणि तेथून पाटण्याला गेले. नंतर यादव आणि इक्रा बंगळुरूमध्ये आले आणि जुनासंद्रा येथे भाड्याच्या घरात राहू लागले.

- Advertisement -

हेही वाचा – सोशल मीडियावरील खोट्या जाहिरातींवर केंद्राची नजर, इन्फ्लूएन्सर्ससाठी नियमावली जारी

मुलायमसिंह यादव यानेही सप्टेंबर 2022पासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी पत्नी इक्राचे नाव बदलून रवा यादव असे केल्यानंतर मुलायमने तिच्यासाठी आधार कार्डाची व्यवस्था केली होती. याच आधारकार्डच्या मदतीने त्याने पत्नीसाठी भारतीय पासपोर्टसाठी अर्जही केला होता. पण इक्राने जेव्हा पाकिस्तानातील आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या नजरेत आली.

- Advertisement -

केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी त्वरित कर्नाटकच्या गुप्तचर यंत्रणेला सतर्क केले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकून दोघांनाही अटक केली. हे दोघेही पाकिस्तानमधील गुप्तहेर संस्थेशी निगडीत आहेत का, या दृष्टीने तपास केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -