देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने, हिंदुत्व वगैरे थोतांड; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

uddhav thackeray address shiv sena workers on balasaheb thackeray 97 th birth anniversary and slams modi govt

देश हुकुमशाहीच्या दिशेने चालला आहे. हिंदुत्व वैगरे थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आधारे धोक्याची भींत उभारून देशावर पोलादी पकड घट्ट बसवायची, अशी बसवायची की तुम्ही हू की चू केलं तर याद राखा म्हणत आज शिवसेना पक्षप्रमुख ( ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त मुंबईतील षण्मुखानंद समागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावरही हल्लाबोल केला आहे.

खोक्यांनी गद्दार विकले घेते जाऊ शकतात. पण शिवसैनिक विकला जाऊ शकत नाही

आमचं ठीक आहे, आम्हाला विद आऊट मेकअप भाषण करता येत. पण आतमध्ये कलाकार आहेत त्यांचं तसं नाही. भाषणाच्या सुरुवातीला म्हटल की, तेच चैतन्य, तोच जोश, तोच उत्साह, गद्दार विकले जाऊ शकतात. खोक्यांनी गद्दार विकले घेते जाऊ शकतात. पण समोर बसलेला शिवसैनिक विकला जाऊ शकत नाही किंवा विकत घेता येऊ शकत नाही, असा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

मला तर थेट अमेरिकेचे अध्यक्ष भेटले… 

संजय राऊत त्यांचे अनुभव सांगत होते, यावेळी त्यांनी गोऱ्या माणसांची आठवण आणि अनुभव सांगितले. मलाही येता येता माहिती कळली, शिवसेना नेत्याला एक माहिती कळते आणि शिवसेना प्रमुखाला माहिती कळत नाही असं कुठे होतं का… संजय राऊतांना कोण भेटलं लकजेम्बरचा पंतप्रधान, पोलंडचा पंतप्रधान, बेल्जिअमचा पंतप्रधान… मला तर थेट अमेरिकेचे अध्यक्ष भेटले, आणी म्हणाले मी, मुद्दा इथे आलो, कारण मी उद्या भाजपात चाललो आहे. . बातमी अशी ऐकली की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरावर एफबीआयने रेड टाकली आणि काही कागदपत्र सापडली. यावेळी इथल्या काही खोकेवीरांनी त्यांनी म्हटले की, आता तू कसा जगणार, ना झोपेचा पत्ता, खायचे वांदे.. भाजपात ये नाही तर मिंदे गटात ये बघं कसं मस्त… हर्षवर्धन पाटलांनी सांगितलेलंच आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भाजप किंवा मिंधे गटामध्ये गेले अशी बातमी येण्याची शक्यता आहे, यात आश्चर्य वाटायची गरज नाही, ज्यांना जिकडे जायचं आणि झोपेसाठी जायचं, जा तिकडे आणि झोपा उठूच नका परतं, म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

देश हुकूमशाहीच्या दिशेला चाललं आहे. हिंदुत्व सगळं थोतांड

यावेळी वंचित ठाकरे गट युतीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले आहेत. योगायोग असेल काही असेल.. काही दिवसांपूर्वी कलिना युनिव्हर्सिटीममध्ये एका कार्यक्रमात होता त्यावेळी रामदास आठवले आणि मी एकत्र होतो. यावेळी बोलताना आठवले म्हणाले की, तुम्ही प्रबोधनकारांचे नातू आणि आम्ही प्रबोधनकारांचे वैचारिक नातू. यावेळी मी त्यांना म्हटले नातू नानी करण्यापेक्षा आपण एकत्र येऊ. एकत्र आणि ते गेले भाजपच्या कळपामध्ये. आज दोन्ही वारसाचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत. दोघं नातू एकत्र आल्यानंतर जे डोक्यावर बसेल, त्याला सांगणार जा तू. आता तुझं काही काम नाही. कारण देश हुकूमशाहीच्या दिशेला चाललं आहे. हिंदुत्व सगळं थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आधारावर धोक्याची भींत उभी करायची आणि त्याआडून देशावर पोलादी पकड घट्ट बसवायची. ती असी बसवायची तुम्ही हु का चू केलं तर याद राखा, म्हणत त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.